भिगवण, ता.3: तक्रारवाडी गावामध्ये आज वीस लाख रुपये निधीच्या भूमीपुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सहाय्याने सामाजिक न्याय विभागातर्फे हा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून बुद्धविहार व पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार आहेत. या कामाचे भूमिपूजन तक्रारवाडी गावच्या सरपंच मनीषा प्रशांत वाघ यांच्या हस्ते संपन्न झाले.
तक्रारवाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहाराचे बांधकाम आणि सुशोभीकरण करण्यासाठी कॅबीनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाकडून २० लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन आढाव यांनी दिली. तक्रारवाडी गाव विकासापासून वंचित राहू नये यासाठी कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला जात आहे.
त्याच विकास निधीतून बौद्ध समाजासाठी बौद्ध विहार बांधकाम आणि सुशोभीकरण अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी सामाजिक न्याय विभागातून २० लक्ष रुपयाचा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे.
या भूमीपूजन कार्यक्रम प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई आढाव, माजी सरपंच सतीश वाघ, राष्ट्रवादी पक्षाच्या इंदापूर तालुका महिला उपाध्यक्षा सीमा काळंगे, उपसरपंच प्रतिनिधी विजय जगताप, माजी सरपंच अनिल काळंगे, गणेश वायदंडे, आण्णा आढाव, माजी उपसरपंच प्रशांत वाघ, लहुजी शक्ती सेना इंदापूर तालुकाध्यक्ष नवनाथ पाठोळे, बी.एस.वाघ, पांडुरंग वाघ, डॉ.बाळासाहेब भोसले, तनुजा आढाव, अक्षय जोगदंड, वैभव आढाव, सुरज जाधव, हेमंत भोसले, योगेश गायकवाड उपस्थित होते.