पुणे: आज अक्षय्य तृतीया आहे. या दिवशी सुरु केलेले काम शाश्वत असते, म्हणजेच या दिवशी केलेल्या पूजा आणि दानातून मिळणारे पुण्य कधीही संपत नाही, असे शास्त्रांमध्ये लिहिले आहे. या तिथीला त्रेतायुग सुरू झाले होते, म्हणून याला युगादी तिथी असेही म्हणतात. दरम्यान, आजचा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो, या विशेष दिवशी सोने आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात. बरेच लोक या दिवशी सोने खरेदी करतात. या शुभ प्रसंगी सोन्याच्या भागात काही अंशी घट झाली आहे. सोन्याच्या किमतीत घट झाली असली तरी, या प्रसंगी सोन्याची मागणी जास्त राहण्याची अपेक्षा आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर, भारतीय बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली. ताज्या आकडेवारीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९७, ९७० रुपये आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८९,७५० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ६० रुपयांनी घट झाली आहे. याचसोबत सोन्यावर जीएसटीदेखील लागणार आहे. त्यामुळे जास्त काही फरक पडणार नाही.
शहरनिहाय सोन्याचे दर:
– मुंबई: – २२ कॅरेट सोने: प्रति १० ग्रॅम८९,७५० रुपये – २४ कॅरेट सोने: प्रति १० ग्रॅम९७, ९७०रुपये
– पुणे: – २२ कॅरेट सोने: प्रति १० ग्रॅम८९,७५०रुपये – २४ कॅरेट सोने: प्रति १० ग्रॅम ९७, ९७०रुपये
– नागपूर: – २२ कॅरेट सोने: प्रति १० ग्रॅम ८९,७५० रुपये – २४ कॅरेट सोने: प्रति १० ग्रॅम ९७, ९७० रुपये
– नाशिक: – २२ कॅरेट सोने: प्रति १० ग्रॅम ८९,७५० रुपये – २४ कॅरेट सोने: प्रति १० ग्रॅम ९७, ९७०रुपये
चांदीचे दर: – चांदी (१ किलो): ₹९७,२५० रुपये – चांदी (१० ग्रॅम): ₹९७३ रुपये
दरम्यान, या शुभ प्रसंगी सोन्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी सराफा बाजारात चांगलीच गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. आजच्या विशेष दिवशी सोने आणि चांदी दोन्ही मौल्यवान वस्तूंची खरेदी करतांना ग्राहक दिसून येत आहेत.