पुणे: अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने केले जाणार आहे. यंदा केंद्रीय पद्धतीने अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा महत्वाचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. प्रवेश प्रक्रिया सुलभ करणे हे या निर्णया मागचे मुख्य उद्दिष्ट आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या घरबसल्या त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयांमध्ये अर्ज करता येणार आहे. सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा पातळीवर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. ११ ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू होणार असून, प्रवेश १५ ऑगस्टपर्यत पूर्ण करण्यात येणार आहेत. प्रवेश घेतांना कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून राज्य सरकारच्या वतीने अधिकृतपणे mahafyjcadmissions.in या संकेतस्थळ आणि ८५३०९५५५६४ हा हेल्पलाइन क्रमांक दिला आहे. आनंदाची बाब म्हणजे नोंदणी शुल्कात कपात करण्यात आली असून आता केवळ १०० नोंदणी करण्यात येणार आहे. अगोदर काही ठिकाणी १२५ रुपये आणि मुंबईत २२५ रुपये आकारले जात होते.
प्रवेश प्रक्रिया 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालये 11 ऑगस्टपासून सुरू होतील. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक संपत सूर्यवंशी यांनी सांगितले कि, ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे मान्यता नसलेल्या संस्थांना आळा बसणार आहे. तसेच ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे लागणारा वेळ आणि पैशाचीही बचत होऊन महाविद्यालयांकडून माहिती पुस्तिका फी, प्रवेशासाठीच्या शिफारसीसाठी घेतली जाणारी अतिरिक्त फीस या प्रकारांनाही ब्रेक लागणार आहे.