पुणे: सोन्याच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली असून दराने नवीन उच्चांक गाठला आहे. देशात शुक्रवारी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ९८,३४० रुपये, २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ९०,२०० रुपये आहे. सोन्याच्या किमती गगनाला भिडले असून आज २५ एप्रिल रोजी सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. याआधी २४ आणि २३ एप्रिल रोजी सोन्याच्या किमतीत सलग दोन दिवस ३% पेक्षा जास्त घसरण झाली होती. याआधी, म्हणजे २३ आणि २२ एप्रिल रोजी, चांदीच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही.
पुण्यातील दर:
२४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹९,८२४ आहे.
२४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ₹९८,२४० आहे.
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹९,००५ आहे.
२२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ₹९०,०५० आहे.
शुद्धता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. हॉलमार्क सोन्याची शुद्धता दर्शवितो आणि खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी ते तपासणे आवश्यक आहे. सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने दागिन्यांच्या बाजारपेठेवर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता आहे.