केडगाव: लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. महाविद्यालयाची तर गोष्टच काही औरच असते. याचा प्रत्यय नुकत्याच 36 वर्षानंतर एकत्र आलेल्या माझी विद्यार्थ्यांकडून पहायला मिळाला. जवळपास 36 वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रांनी शाळेत असताना केलेल्या गमती-जमती, शिक्षकांनी केलेली शिक्षा, अशा अनेक आठवणींना उजळा दिला. धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतलेला आहे; पण महाविद्यालयाची आठवण कायम येत असल्याचे प्रत्येकाच्या तोंडून निघाले.
भैरवनाथ विद्यालय, खुटबाव येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. 1990- 91 या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा 36 वर्षानंतर भरवण्यात आला होता. खूप वर्षानंतर एकत्र आल्याने अनेक विद्यार्थ्यांनी ओळख करून दिली. तसेच जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम या मेळाव्याच्या निमित्ताने करण्यात आले. या मेळाव्यासाठी मुले व मुली असे 32 माजी विद्यार्थी उपस्थित होते. यामधील काही विद्यार्थी आज इंजिनियर ,शिक्षक, उद्योजक, व्यावसायिक व कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देण्याचे काम करत आहेत.
या माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन मेहेर ऍग्रो टुरिझम खुटबाव या ठिकाणी करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व मित्रत्वाच्या नात्याने एक झाड देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन खुटबाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच दिगंबर थोरात यांनी केले होते. अविनाश ढमढेरे, संदीप थोरात, महेंद्र गरुड, सुनील थोरात, सुरेश थोरात, गणेश शितोळे, राजू शितोळे, दीपक दोरगे, राजू फणसे, अभिजीत शेलार, दिलीप पायगुडे , सुभाष मांढरे, सतीश दोरगे,अरुण कदम, जे. के. जाधव, संदीप गिरमे, राजकुमार शेलार, अनंता गोसावी, संजय अडगळे, संजय रुपणवर ,विजय कुंजीर,संगीता मेमाणे ,बेबी पवार, संगीता शिंदे, शालन फडके, लक्ष्मी पाठक उपस्थित होते.