पुणे : महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे सध्या सर्वत्र चर्चा आहे.. आता या योजनेतील लाभार्थी महिलांच्यां अर्जांची सरकारने कडक पडताळणी सुरू केली आहे… योजने संदर्भात आता सरकारने नवा नियम विचार केला असून या नियमांनुसार आता लाडक्या बहिणींना दरवर्षी जून महिन्यात केवायसी करणं बंधनकारक राहणार आहे.

या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत केली जाते.. आतापर्यंत जुलै ते जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमाही झाला होता.. आता फेब्रुवारी महिन्याचां आता कधी येणार याकडे लाडक्या बहिणीच्या नजरा लागून राहिल्या आहेत .. अशातच आता सरकारने केलेल्या नव्या नियमानुसार दरवर्षी जून महिन्यात लाडक्या बहिणींना केवायसी करणे बंधनकारक राहणार आहे.. त्याचबरोबर 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी आणि लाभार्थी हयात आहे किंवा नाही याची तपासणी करूनच लाडकी बहीण योजनेचा पुढील लाभ दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे..
दरम्यान महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी कोणत्याही लाभार्थ्या महिला संदर्भात तक्रार आली असेल तर तिच्या अर्जाची छानंनीं करण्यात येईल त्यानुसार निकष बाह्य भरलेले अर्ज अपात्र करण्याचा निर्णय झाल्याचं त्यांनी म्हटलं..योजनेच्या निकषांचे उल्लंघन करीत गैरफायदा घेतलेल्या पाच लाख बहिणींना सरकारने गेल्याच आठवड्यात अपात्र ठरविले होते. या योजनेवरील उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी योजनेत काही सुधारणा करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समोर आले आहे. त्यामुळे सरकारने नवीन केलेले नियम लाडक्या बहिणींना पाळावे लागणार आहेत..








