Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

समान काम-समान वेतनासाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचारी आक्रमक; शिरूर न्यायालयातील ७६ कर्मचारी बेमुदत संपावर!

योगेश मारणेby योगेश मारणे
Tuesday, 17 November 2026, 22:40

शिरूर: उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच जिल्हा व तालुका न्यायालयांमधील कर्मचाऱ्यांनाही ‘समान काम-समान वेतन’ लागू करावे, या मागणीसाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या राज्यव्यापी आंदोलनात घोडनदी-शिरूर येथील विविध न्यायालयांमधील एकूण ७६ कर्मचारी सहभागी झाले असून, त्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकत संपाचे हत्यार उपसले आहे.

उच्च न्यायालयाने न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या प्रस्तावाला यापूर्वीच मंजुरी दिलेली आहे. मात्र, हा प्रस्ताव गेल्या २२ महिन्यांपासून महाराष्ट्र शासनाच्या स्तरावर प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शासनाकडून याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसल्याने अखेर राज्यातील सुमारे ३४ हजार न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे बेमुदत संप पुकारला आहे.

शिरूर येथील मा. सत्र न्यायालय, मा. दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) आणि मा. सह-दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) येथील आस्थापनेवरील सर्व ७६ कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्यामुळे न्यायालयातील नियमित प्रशासकीय कामकाजासह विविध दैनंदिन कामांवर परिणाम झाला आहे. न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या पक्षकार, वकील आणि नागरिकांनाही या आंदोलनाची झळ बसण्याची शक्यता आहे.

या आंदोलनात शिरूर न्यायालयातील लघुलेखक एस. एन. पाटील, लिपिक जी. एस. जोशी, मुख्य बेलिफ एस. डी. मोडक, शिपाई जे. डी. वाघमोडे यांच्यासह सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी सुहास नेवासकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

२२ महिन्यांची प्रतीक्षा, आता बेमुदत आंदोलन!

उच्च न्यायालयाने मंजुरी दिलेला प्रस्ताव शासनाकडे इतका प्रदीर्घ काळ प्रलंबित राहणे ही कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने चिंतेची बाब बनली आहे. समान कामासाठी समान वेतन मिळणे हा आमचा न्याय्य हक्क असून, शासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन प्रलंबित प्रस्तावाला मंजुरी द्यावी, अशी भूमिका आंदोलक कर्मचाऱ्यांनी मांडली आहे.

जोपर्यंत शासनाकडून वेतनवाढीच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत हे बेमुदत कामबंद आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार शिरूरसह राज्यभरातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शासन या आंदोलनाची दखल घेऊन किती लवकर निर्णय घेते, याकडे आता न्यायालयीन कर्मचारी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

समान काम-समान वेतनासाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचारी आक्रमक; शिरूर न्यायालयातील ७६ कर्मचारी बेमुदत संपावर!

Tuesday, 17 November 2026, 22:40

ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; शहरात तीन ठिकाणी उभारले जाणार नवे आधुनिक पादचारी पूल!

Tuesday, 17 November 2026, 22:23

चल गं सखे पंढरीला! वारकऱ्यांसाठी खुशखबर; कार्तिकी वारीनिमित्त मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; धावणार तब्बल ३६ विशेष गाड्या

Tuesday, 17 November 2026, 21:58

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार १८ हजारांवरून थेट ६९ हजार होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट; वाचा सविस्तर…

Tuesday, 17 November 2026, 18:53

शिवसेना कोणाची? सुनावणी अंतिम टप्प्यात; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, नेमकं काय घडलं…

Tuesday, 17 November 2026, 18:51

“अमित शहांनी अजित पवारांचं जगणं मुश्किल केलं होत” उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?

Tuesday, 17 November 2026, 18:43
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp