Fire News : शिक्रापूर (पुणे) : शिक्रापूर ग्रामपंचायत हद्दीतील पाबळ चौकात असलेल्या दोन दुकानांना लागलेल्या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी (ता. ०५) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाच्या दोन तुकड्यांमुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
आग नियंत्रणात आणण्यात यश
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथील पाबळ चौकातील बांदल कॉम्प्लेक्सच्या इमारतीतील फोटोचे स्टुडिओचे व केकचे दुकान आहे. (Fire News) शनिवारी रात्री त्यातील एका दुकानाला आग लागली. काही वेळातच आगीने मोठा पेट घेत शेजारील एका फोटो स्टुडिओला वेढा घातला. पाहतापाहता आगीने रौद्ररूप धारण केले होते. याबाबतची माहिती पोलिसांनी तातडीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलांना दिली.
यावेळी इमारतीच्या तिसर्या मजल्यावर काही महिला असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिस हवालदार शंकर साळुंके यांनी तातडीने वर जाऊन महिलांना सुरक्षितपणे खाली आणले. (Fire News) काही वेळातच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाचे नितीन माने, महेश पाटील, प्रशांत चव्हाण, प्रकाश मदने, सुरज इंगवले तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाचे रितेश गायकवाड, अमोल गायकवाड, किशोर सांगळे, भाऊसाहेब बागूल यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
दरम्यान, आगीने दोन दुकानांना वेढा घातल्याने केक शॉप व फोटो स्टुडिओच्या दुकानांचे पूर्णपणे नुकसान झाले, तर केक शॉपशेजारील एका मेडिकलचे काही प्रमाणात नुकसान झाले. (Fire News) या आगीमध्ये तब्बल ५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Fire News | पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग ; आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न…