पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीला ही आग लागली आहे. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुण्यातील ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीला सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या तिसरा आणि चौथ्या मजल्यावर ही आग लागली. रुग्णालयात मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. यामुळे रुग्णालयात एकच खळबळ उडली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचं काम सुरु केलं. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. आग लागल्यानंतर इमारतीमधील रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले. मात्र, आगीची तीव्रता पाहता प्रशासनाने तातडीने सर्व रुग्णालयांना बाहेर काढण्यात आले आहे. ससून रुग्णालयाच्या इमारतीचे वरील चार मजल्यांना ही आग लागली.
दरम्यान रुग्णालयाच्या वार्डमधील रुग्णदेखील सुखरुप आहेत. आग पूर्ण विझली असून धोका दुर झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी वा जिवितहानी झालेली नाही. शौचालयात कोणी धुम्रपान केल्याने आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.