Friday, May 16, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आमच्या जमिनी घ्या, पण रेडी रेकनरच्या 5 पटीने मोबदला द्या; कदमवाकवस्ती येथील शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 25 March 2025, 18:56
Farmers of kadamvakvasti demands five time of ready reckoner money for ring road land pune

लोणी काळभोर : विकासासाठी आमचा कोणाचाही विरोध नाही. रिंगरोड करण्यासाठी लागेल, तेवढ्या आमच्या जमिनी घ्या. पण मोबदला मात्र दोन अडीच पटीने नव्हे, तर रेडी रेकनरच्या पाच पटीने मिळाला पाहिजे, असा आक्रमक पवित्रा घेत कदमवाकवस्ती येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.

प्रारुप विकास योजनेतील 65 मीटर रुंद रस्त्यासाठी सन 2015 च्या नवीन भूसंपादन अधिनियमाव्दारे खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी करावयाच्या जमीनीच्या भूसंपादन या प्रस्तावासंदर्भात कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या मैदानात प्रशासन व शेतकरी यांच्यामध्ये प्राथमिक बैठक दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पार पडली. यावेळी शेतकऱ्यांनी वरील भूमिका घेतली.

यावेळी पुणे भूसंपादन उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, भूसंपादन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अव्वल कारकून विद्या गायकवाड, सुरेखा काकडे, एकनाथ ढाके, मंडलाधिकारी योगिता गायकवाड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणचे कार्यकारी अभियंता अरविंद माळी, वरिष्ठ अभियंता अमित हस्ते, तहसीलदार आशा होळकर, पुणे जिल्हा भूमी अभिलेखचे निरीक्षक जयसिंग गाडे, लिपिक रोहित चोपडे, भूकरमापक स्नेहा भिसे, मंडलाधिकारी लक्ष्मण बांडे आदी अधिकारी उपस्थित होते.

पुणे रिंग रोड हा 65 मीटरचा असून बावडी, लोहगाव, वाघोली, मांजरी खुर्द, कदमवाकवस्ती येथील रिव्हर व्ह्यू सिटीच्या जवळून पिराच्या मंदिरापासून फुरसुंगी व पुढे वडकीच्या दिशेने जाणार आहे. या रिंगरोडमध्ये कदमवाकवस्ती येथील शेकडो शेतकऱ्यांची अंदाजे 17 एकर जमीन (67581.54 चौ. मी.) या रस्त्यामध्ये जाणार आहे. प्रशासनाला जमीन खरेदी करून क्षेत्र विकत घ्यायचे आहे.

पुणे भूसंपादन उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे म्हणाले की, वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी रिंग रोड तयार करण्यात येत आहे. यामध्ये कदमवाकवस्ती येथील अनेक शेतकऱ्यांचे क्षेत्र जात आहे. त्याचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लोकहित व विकासासाठी क्षेत्र देऊन सहकार्य करावे. तसेच या क्षेत्राच्या बदल्यात शेतकऱ्यांना शासनाकडून रेडी रेकनरच्या अडीच पटीने मोबदला देण्यात येणार आहे, असेही पांढरे यांनी सांगितले.

याला प्रतिउत्तर देताना अनेक शेतकरी आक्रमक झाले. यावेळी बोलताना शेतकरी गणपत चावट म्हणाले की, क्षेत्र देण्यासाठी आमची काहीही अडचण नाही. पण रेडी रेकनरच्या अडीच पट मोबदला आम्हाला मान्य नाही. जर शासनाने रेडी रेकनरच्या ५ पटीने मोबदला दिला, तरच आम्ही आमच्या जमिनी देऊ. अन्यथा आम्ही जमिनी देणार नाहीत. तसेच सर्कल जर रद्द केले तर व्यावसायिकांची दुकाने व शेतकऱ्यांची घरे वाचतील.

दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर रस्त्याच्या रुंदीकरण, रिंग रोड, शिवरस्ता याबाबतच्या तक्रारी अधिकाऱ्यांना सांगितल्या. तसेच काही शेतकऱ्यांचे क्षेत्र रिंग रोडमध्ये गेले आहे. मात्र त्यांचे या यादीत नावे नाहीत. मग त्यांना मोबदला मिळणार का? यावेळी पीएमआरडीए व भूसंपादनाच्या अधिकाऱ्यांनी सूचनांची नोंद करून घेतली आहे.

यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अनिल टिळेकर, उद्योजक बाळासाहेब भोसले, गणपत चावट, चित्तरंजन गायकवाड, कदमवाकवस्तीचे उपसरपंच नासिर पठाण, सदस्य आकाश काळभोर, माजी उपसरपंच ऋषिकेश काळभोर, उदय काळभोर, सुशील काळभोर तुषार काळभोर, ग्रामसेवक अमोल घोळवे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बीडमध्ये भीषण अपघात ; भरधाव कंटेनरने 8 ते 10 वाहनांना उडवले अन्…

Friday, 16 May 2025, 22:01

वारकरी संप्रदायाचे प्रचारक व ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी यांचे निधन..

Friday, 16 May 2025, 21:44

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची अखेर पुणे शहरात बदली, नवीन पोलीस अधीक्षक कोण असणार?नागरिकांचे लक्ष

Friday, 16 May 2025, 21:06

धक्कादायक ; अज्ञात व्यक्तीकडून तरुणीवर चाकूने सपासप वार, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

Friday, 16 May 2025, 20:37

प्रवासी महिलांचे दागिने लुटणारी मांजरीतील चौघांची टोळी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

Friday, 16 May 2025, 20:31

पुण्यात मेधा कुलकर्णी आणि शेखर चरेगावकर यांच्यातला वाद टोकाला ; काय आहे कारण?

Friday, 16 May 2025, 19:51
Next Post

रेल्वेत सहाय्यक लोको पायलट पदासाठी भरती : तब्बल ९९७० रिक्त जागा, कसा कराल अर्ज?

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.