Farmer News | पुणे : कांद्याला भाव नाही, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पचनामे नाहीत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात आता भर म्हणून जनावरांच्या खाद्यांच्या खर्चात देखील वाढ झाल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कडबा शेकडा 3500 ते शेकडा 5000…
वाल्हे, हरणी, आडाचीवाडी, मांडकी, दौंडज, राख, नावळी, वागदरवाडी, सुकलवाडी आदी परिसरात कडब्याला मोठा भाव मिळत आहे. कडबा शेकडा 3500 ते शेकडा 5000 रुपयांपर्यंत जाऊन पोहचला आहे. चारा महागल्याने दुधाचा प्रतिलिटर निर्मिती खर्चही वाढणार आहे. याला कारण म्हणजे जनावरांना ओला चारा म्हणून, वापरात येणारे उसाचे वाडे आता उसाचा हंगाम संपत आल्याने बंद झाले आहे. तर वाड्याला पर्याय असणारे मका, हत्तीघास या गवताची लागणदेखील कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे चार्याचा भाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे.
ऑक्टोबर महिन्यापासून उसाचे वाडे ओला चारा म्हणून उपलब्ध होता. मात्र, मार्चच्या मध्यानंतर ओल्या चार्याची टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली. मागील पंधरवड्यात अवकाळीच्या धास्तीने अनेक बाहेरगावच्या व्यापार्यांनी या परिसरात येऊन, कमी- जास्त बाजारभाव ठरवून मोठ्याप्रमाणावर कडबा खरेदी केला.
बाहेरील जिल्ह्यात कडबा गेल्याने स्थानिक पशुपालकांना कडबा कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. परिणामी, उपलब्ध कडब्याला भाव आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Saswad News | कोडीत खुर्द येथील पाणीप्रश्न सुटला; गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे होणार पाणीपुरवठा
Chaturthi Vishesh : ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास