विशाल कदम
लोणी काळभोर : आपला देश हा आज एकविसाव्या शतकात अनेक क्षेत्रात प्रगती करत आहोत. विज्ञानाच्या आजच्या युगात देखील अंधश्रद्धेला माननारे अनेक नागरिक आपल्या सभोवती दिसतील. याच अंधश्रद्धेपायी मांजरी फार्म येथील एक शेतकरी उध्वस्त होता होता वाचला.
पुणे-सोलापूर महामार्गावरील मांजरी फार्म (ता. हवेली) येथील ‘ग्रांड बे’ सोसायटीच्या समोर एकाने पाटीत उतारा टाकून दुपारी बाराच्या सुमारास जाळला होता. जाळल्याने या उताऱ्यातील अनेक गोस्ती ज्वलनशील होत्या. वाऱ्यामुळे यातील काही निखारे उडून शेजारच्या शेतात उडाले. याच उडालेल्या निखाऱ्यांमुळे ही आग थेट शेताला लागली. मात्र, शेतकऱ्यांच्या सुदैवाने यावेळी कोणतेही पीक शेतात नसल्याने, होणारे आर्थिक नुकसान टळले, असेच म्हणावे लागेल.
दरम्यान, एकविसाव्या शतकात आजही अंधश्रद्धेला खतपाणी मिळत आहे. याचे सार्वत्रिक उदाहरण म्हणजे अमावस्येला ठिकठिकाणी आजही लिंबू मिरचीचा उतारा पाहायला मिळत असतो. मात्र आताही अंधश्रद्धेच्या नावाखाली लिंबू, मिरची, खिळे, टाचण्या, काळ्या बाहुल्या, बुक्की, भंडारा, अन् नारळाचा उतरला टाकला जातो.
धुरामुळे वहातुकीचा वेग मंदावला…!
शेताला लागलेल्या आगीमुळे या भागात धुराचे साम्राज्य पसरले होते. याचा परिणाम पुणे सोलापूर महामार्गावरील वहातुकीवर झाला. या धुरांच्या लोटामुळे महामार्गावरील दृश्यमानता कमी झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. मंदावलेल्या वाहतुकीमुळे महामार्गावर वाहतूककोंडी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. तर दुचाकीवरील चालकांच्या डोळ्यात धूर गेल्यामुळे त्यांना त्रास होत होता.
अग्निशामक दलाला ‘वर्दीच’ नाही…!!
उतारा जाळून टाकल्याच्या प्रकारामुळे शेजारीच असणाऱ्या शेताला आग लागली होती. धुराचे लोट पसरून पुणे सोलापूर महामार्गावरील वहातुक देखील मंदावली होती. असे असताना देखील शेत सुमारे तासभर जळत होते. जळणाऱ्या शेताकडे पाहणारे अनेक ‘बघे’ जमले होते. मात्र, त्यांच्यापैकी कुणालाच अग्निशामक दलाला या घटनेची ‘वर्दी’ द्यावी असे वाटले नाही, हीच खरी शोकांतिका आहे, असे म्हणावे लागेल.