लोणी काळभोर : मान्सूनपूर्व पावसाने मागील तीन दिवसांपासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील सदाशिव पाटीलबुवा जवळकर यांच्या घरावर सायंकाळी साडे सहा ते पाऊणे सात वाजण्याच्या सुमारास वीज पडली आहे. या घटनेत घराच्या दोन्ही बाजूंच्या भिंती कोसळल्या असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दरम्यान, वीज कोसळली यावेळी सदाशिव जवळकर यांच्या घरात तब्बल अकरा कुटुंबीय होते. या घटनेत त्यांना कोणतीही दुखापत झाली नसून त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.