dresscode in Ranjangaon Mahaganpati temple शिरुर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेली आई तुळजा भवानी माता मंदिर प्रशासनाने नव्या ड्रेसकोडबाबत बोर्ड लावल्यानंतर आता पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील मंदिर प्रशासनाने देखील ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मंदिरात वेस्टर्न कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. (dresscode in Ranjangaon Mahaganpati temple)
रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देखील समोर आली आहे. याबाबत गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टने याबाबची नोटीस लावली असून या जाहीर नोटिसीवर वेस्टर्न कपड्यांना बंदी आणल्याचे सुचित करण्यात आले आहे. (dresscode in Ranjangaon Mahaganpati temple)
कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात वेस्टर्न कपड्यांवर बंदी घालण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. तोडके कपडे घालून देवीचे देवीच्या दर्शन करण्यास मनाई करण्यात आली आहे. (dresscode in Ranjangaon Mahaganpati temple) भारतीय संस्कृती व सभ्यतेचे भान राखण्याचे आवाहनही संस्थानने केले आहे. तसा आशयाचा फलकदेखील तुळजाभवनी मंदिरात फलक लावण्यात आला आहे. असभ्य वस्त्र परिधान करुन येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक आजपासून मंदिरात लावण्यात आले आहे. त्यानंतर आता पुणे जिल्ह्यातील महागणपती रांजणगाव मंदिरात देखील वेस्टर्न कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
असभ्य व अशोभनीय वस्रधारींना मंदिरात प्रवेश नाही
अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्रधारी तसेच हाफ पॅन्ट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. याची सर्व भाविकांनी मोंद घ्यावी.’ असा आशय बोर्डवर लिहिण्यात आला आहे.(dresscode in Ranjangaon Mahaganpati temple) तसेच या नोटिसीमधून देवस्थान ट्रस्टकडून भाविकांना वेस्टर्न कपडे घालून येऊ नये अशी विनंती देखील करण्यात आली आहे. रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत वेस्टर्न कपड्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, रांजणगाव गणपती दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. लाखोंच्या संख्येने या मंदिरात दर्शनासाठी गर्दी असते. अनेक भाविक या ठिकाणी तर मुक्कामी देखील असतात. (dresscode in Ranjangaon Mahaganpati temple) मात्र प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक वाद निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. याबाबतचे बोर्ड सद्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Collector Pune news : पुणे- अहमदनगर महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा : जिल्हाधिकारी
Pune Railway news : पुणे रेल्वे स्थानकावरील ७४ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई
Crime Pune news : विमा कंपन्यांकडून लाखो रिक्षाचालकांची होतेय लूट