उरुळी कांचन, (पुणे) : येथील डॉक्टर सायरस पुनावाला इंग्लिश मीडियम स्कूलच्या (सी.बी.एस.ई.) इयत्ता दहावी आणि बारावी कॉमर्सचा निकाल 100 टक्के, तर सायन्सचा निकाल 99 टक्के लागला आहे. विद्यालयाने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली असून विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून यश संपादन केले आहे.
उरुळी कांचन परिसरातील डॉक्टर सायरस पूनावाला इंग्लिश मीडियम स्कूल उरळी कांचन येथून दहावी आणि बारावीची परीक्षा विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
इयत्ता 10 वीतील पहिल्या चार विद्यार्थ्यांचे गुण खालीलप्रमाणे :
प्रथम वेदिका बाप्ते 95.20%, द्वितीय रिया कुमार 94.00%, तृतीय ज्ञानिश दौंडकर 93.20%, चिन्मय कुलकर्णी 93.20%, चतुर्थ रितेश कांचन 92.60%, विद्यालयातील 8 विद्यार्थी 90% व त्यापेक्षा जास्त मार्क मिळवलेले आहेत. 80% मध्ये 25, 70% टक्केमध्ये 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दरम्यान, बारावीतील सायन्स शाखेत आदित्य सोनवणे याला 92.60% तर कॉमर्स शाखेत गोकुळ लटवाल याने 90.80% मिळवले असल्याची माहिती प्राचार्या राजीकुमारी लक्ष्मी यांनी दिली. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्य व विश्वस्त, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थांनी मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक केले असून पुढील शिक्षणासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.