उरुळी कांचन, (पुणे) : मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारातून राज्य सरकारकडे जमा होणाऱ्या मुद्रांक शुल्काचे पंचायत समिती हवेली अंतर्गत 71 ग्रामपंचायतींना 2022-23 करीताचे मुद्रांक शुल्कांचे वाटप करण्यात आले आहे.
हवेली तालुका नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून हवेली तालुक्यातील ग्रामपंचायतींना ठरवून दिलेला निधी मिळत नसल्याने ग्रामपंचायतींचा विकास होत नाही. 2015-16 पासून अनुशेष प्रलंबित असून तो अनुशेष पूर्ण करून 2023-24 च्या मुद्रांक शुल्कासह त्वरित वर्ग करण्यात यावा, अशी मागणी हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
गट विकास अधिकारी, पंचायत समिती हवेली यांचेकडून त्यांच्या क्षेत्रामध्ये सहा. निबंधक कार्यालयाकडून प्रमाणित याद्यांचे एकत्रीकरण करुन व त्यामधून शासकीय वजावटी करून सदर केलेले देयक संबंधित ग्रामपंचायतीना त्यांचे ग्रामनिधी खाती वितरीत करण्यात या आदेशान्वये मान्यता देण्यात आली आहे.
शासनाच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग ग्रामपंचायतींना त्यांच्याकडे नोंद झालेल्या दस्तांवरून मिळालेल्या मुद्रांक शुल्कामधील 1 टक्का मुद्रांक शुल्क तालुक्यातील गावांच्या विकास निधीसाठी देण्यात येतो. या एक टक्क्यामध्ये 50 टक्के रक्कम जिल्हाधिकारी यांच्याकडे 25 टक्के रक्कम जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतींना व 25 टक्के रक्कम पीएमआरडीला विकासकामांसाठी ठरलेली असते.
हवेली पंचायत समितीकडून जिल्हा परिषद कार्यालयाकडे तालुक्यातील 27 सहाय्यक नोंदणी निबंधक कार्यालयाकडील दस्त नोंदणींची व त्यापोटी मिळालेल्या मुद्रांक शुल्काची यादी सादर केली नसल्याने, नोंदणी व मुद्रांक शाखेकडून आलेला निधी वाटप सध्या थांबलेले होते.
दरम्यान, याबाबत बोलताना हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर म्हणाले, ” राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने याबाबत आवाज उठवला होता. या मागणीला यश आले आहे. हा फक्त 2023-24 चा मुद्रांक शुल्क परतावा देण्यात आला आहे. जो मोठ्या प्रमाणात 2015-16 पासून अनुशेष प्रलंबित असून तो अनुशेष पूर्ण करून लवकर देण्यात यावा. त्यामुळे जेणेकरून जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींना त्यातून विकास कामे मार्गी लावणे शक्य होईल.
पूर्व हवेलीतील ग्रामपंचायतीचे नाव व मिळणारी रक्कम कंसात…
लोणी काळभोर (27 लाख 75 हजार 256 रुपये)
कदमवाकवस्ती (48 हजार 510)
कुंजीरवाडी (6 लाख 76 हजार 826 रुपये)
लोणीकंद (51 लाख 76 हजार 484 रुपये)
उरुळी कांचन (18 लाख, 7 हजार 83 रुपये)
सोरतापवाडी (10 लाख 20 हजार 785)
नायगाव (4 लाख 43 हजार 234 रुपये)
कोरेगाव मूळ (35 लाख 99 हजार 299 रुपये)
वळती (77 हजार 91 रुपये)
शिंदवणे (6 लाख 22 हजार 390 रुपये)
तरडे (1 लाख 51 हजार 775 रुपये)
भवरापूर (53 हजार 219 रुपये)
आळंदी म्हातोबा (5 लाख 8 हजार 241 रुपये)
प्रयागधाम (4 लाख 45 हजार125 रुपये)
पेठ (3 लाख 92 हजार 453)
कोलवडी साष्टे (19 लाख 32 हजार 512 रुपये)
थेऊर – (22 लाख 41 हजार 65 रुपये)
अष्टापूर (6 लाख 9 हजार 462 रुपये)
हिंगणगाव (39 हजार 343रुपये )
शिंदेवाडी (15 लाख 5 हजार 895 रुपये)
टिळेकरवाडी (2 लाख 7 हजार 222 रुपये)
खामगाव टेक (9 हजार 511रुपये)