पुणे : पुण्यातील अपघाताचे सत्र सुरुच आहेत. अशातच आता पुणे सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या भीषण अपघातात धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या किरकोळ जखमी झाल्या आहेत. हा अपघात गुरुवारी (दि.17) पहाटे पुणे सोलापूर महामार्गावर झाला आहे.
पुणे सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे कार आणि ट्रॅव्हल्स बस यांच्यात जोरदार धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून ट्रॅव्हल्सचेही मोठे नुकसान झाले आहे.