सासवड : श्री क्षेत्र कोडीत (ता. पुरंदर) येथे आषाढ अमावस्यानिमित्त रविवार (दि. ४) श्रीनाथ म्हस्कोबा महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान अमावस्यानिमित्त पहाटे ४:३० वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी ६ वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळपासूनच कोडीत देवस्थान ट्रस्ट व भाविकांच्या वतीने दही, दूध, पंचामृत अभिषेक करण्यात आले.
यावेळी गुलालाची उधळण करीत ढोल-ताशांचा गजर करीत नाथ साहेबाचं चांगभल गजर करण्यात आला. त्यानंतर नैवैद्य घेऊन मंदिर प्रदक्षिणा झाली. दुपारी १२ वाजता देवाची धुपारती होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. दुपारी १:१५ वाजता गाभारा पुन्हा दर्शनासाठी खुला करण्यात आला. समस्त म्हस्कोबावाडी मंडळ, कोडीत यांनी भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले होते.
यावेळी श्रीनाथ म्हसोबा महाराज ट्रस्टचे बाळासो आश्रु बडधे, बाळासो यशवंत बडधे, ईश्वर बडधे, सुदाम बडधे, सागर बडधे, रमेश जरांडे, निवृत्ती बडधे, सचिन बडधे, संतोष बडधे, अनिल बडधे, तानाजी बडधे, गणेश बडधे, नरेंद्र बडधे, आप्पा बडधे, शेखर बडधे, योगेश खुटवड आदी बहुसंखयेने भाविक भक्त आदी उपस्थित होते.