Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : पुणे सोलापूर महामार्गावरील हडपसर ते पंधरा नंबरपर्यत उभ्या असलेल्या खाजगी बसवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी पुणे शहर पोलिसांना दिले आहेत.
शुक्रवार रात्रीपासून कारवाई सुरू
(Loni Kalbhor News) त्यानुसार शहर पोलिसांनी शुक्रवारी (ता. १९) रात्रीपासून कारवाईचा बडगा उगारला आहे. (Deputy Commissioner of Police’s order to clear the traffic jams between Hadapsar and 15th number by private buses (travel); Praveen Kalbhor had demanded..)
कदमवाकवस्ती येथील जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीण काळभोर यांनी दौंडचे आमदार राहल कुल यांच्याकडे नागरिकांना होणारा वाहतूक कोंडीचा त्रास व सोलापूर महामार्गावरील हडपसर ते पंधरा नंबर यामार्गावर रस्त्यावर उभ्या राहत असलेल्या खाजगी बसेसमुळे मध्यरात्रीपर्यत होत असलेली वाहतूक कोंडी याबाबत प्रवीण काळभोर यांनी राहल कुल यांच्याकडे निवेदन दिले होते. (Loni Kalbhor News)
त्यानुसार आमदार राहल कुल यांनी हडपसरचे आमदार चेतन तुपे, पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, प्रवीण काळभोर यांच्या बैठकीचे आयोजन शुक्रवारी (ता. १९) करण्यात आले होते. (Loni Kalbhor News)
यावेळी आमदार कुल म्हणाले, पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर परिसरात मोठ्या प्रमाणावर खाजगी बसेस थांबतात यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असुन नागरीकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (Loni Kalbhor News) तसेच लोणीकाळभोर ते हडपसर दरम्यान वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त असून त्यामधून देखील मार्ग काढण्याची मागणी कुल यांनी मगर यांच्याकडे केली. (Loni Kalbhor News) यावेळी पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी पुणे शहर पोलिसांना रस्त्यात उभ्या असलेल्या खाजगी बसेसवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी आमदार चेतन तूपे म्हणाले, खाजगी वाहतूक करणाऱ्या बसेसला शेवाळेवाडी येथील पीएमपीएमएल येथील खाजगी बस डेपोची जागा महानगर पालिकेचे आयुक्त यांच्याकडून भाडेतत्वावर घेऊनही जागा ज्या त्या खाजगी बस वाल्यांना देता येईल. त्यामुळे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी नियंत्रणात येईल.(Loni Kalbhor News)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Traffic | वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ भागातील वाहतूकीत तात्पुरते बदल…