लोणी काळभोर: कुंजीरवाडी (ता.हवेली) येथील जुन्या पिढीतील महिला शेतकरी म्हणून ओळख असलेल्या सुगंधाबाई मुरलीधर धुमाळ (वय-83) यांचे मंगळवारी (ता.8) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले आहे. हे. अत्यंत हुशार, प्रेमळ, मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपल्याने कुंजीरवाडी सह परिसरात शोककळा पसरली आहे.
सुगंधाबाई धुमाळ यांच्या पार्थिवावर कुंजीरवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, व नातवंडे असा परिवार आहे.
कुंजीरवाडी येथील श्रीनाथ पतसंस्थेचे कार्यकारी संचालक तथा एलआयसी ऑफ इंडियाचे झोनल क्लब मेंबर ज्ञानेश्वर धुमाळ व गणेश रोडलाईन्सचे मालक तुकाराम धुमाळ यांच्या त्या आई होत. तर श्रीनाथ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप धुमाळ यांच्या त्या चुलती होत.