गणेश सूळ
MLA Rahul Kul : केडगाव : तरुण पिढीने शिक्षणाबरोबरच व्यवसाय व उद्योग क्षेत्रात वळले पाहिजे. ही एक अत्यंत काळाची गरज आहे. असे मत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी मांडले आहे. (Young generation should turn to industry and business: MLA Rahul Kul)
केडगाव (ता. दौंड) येथील युवा उद्योजक मयूर शेलार यांच्या मल्हार ग्राफिक्स या नूतन व्यवसायाचे उद्धघाटन दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आले. (MLA Rahul Kul News) यावेळी आमदार राहुल कुल बोलत होते. यावेळी ह भ प सुरेश महाराज साठे, विकास शेलार, पोपटभाई ताकवणे, माऊली ताकवणे, निलमताई काटे, अरुण बोत्रे , प्रवीण शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
चिकाटीने धेय्य साध्य करावे
कुल म्हणाले की, ”नुकत्याच पार पडलेल्या पोलिस भरती प्रक्रियेत केडगाव परिसरातून ११ जण यशस्वी झाले आहेत. या यशस्वी उमेदवारांमध्ये ४ मुलींचाही समावेश आहे. आजच्या तरुण पिढीने काही मिळवायचे असेल तर धेयाकडे लक्ष केंद्रित करावे. (MLA Rahul Kul News) संघर्षातच विजय आहे. चिकाटीने धेय्य साध्य करावे. जो या स्पर्धेच्या युगात टिकेल तोच टिकेल नाहीतर येणारा काळ हा खूप वाईट असेल.”
प्रत्येक क्षेत्रात अफाट जिद्द ,कष्टाची तयारी आणि बुध्दीमत्ता, कल्पकता वापरून उद्योग क्षेत्रात तरुणांनी आपल्या करियरची सुरुवात करावी. परिस्थिती कठीण असो जिद्द ,कष्ट, आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर कठोर प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते.(MLA Rahul Kul News) हा अनुभव त्यांनी खुटबाव येथील यशस्वी उद्योजक सागर शिंदे यांचे आवर्जून उदाहरण दिले.
सागर शिंदे यांनी पर्यावरण पूरक कुंड्या दुबई सारख्या ठिकाणी विकण्याच यशस्वी प्रयोग केला आहे. शिंदे यांनी अभियांत्रिकी शिक्षणाबरोबच प्लास्टिक कुंड्या, चष्माच्या पेट्या, व्हिजिटिंग कार्ड स्टँड अशा वस्तू आपल्या ग्रामीण भागात बनवून इतर देशात तसेच विविध राज्यात पोहचवत आहे. (MLA Rahul Kul News) शिंदे यांना तब्बल १ लाख २५ हजार कुंड्याची दुबई मध्ये ऑर्डर मिळाली आहे.
तरुणांनी काळाच्या ओघात लुप्त न होता काळाप्रमाणे बदलने गरजेचे आहे. आपल्या परिसरातील नवीन उद्योजक , व्यावसायिक तयार व्हावेत अशा दृष्टिकोनातून व्यावसायिक उद्योजक देलवडिकर असा नावीन्यपूर्ण उपक्रम देलवडीकरानी राबविला आहे. (MLA Rahul Kul News)
दरम्यान, या उपक्रमामध्ये देलवडी व गावातील बाहेर स्थाईक झालेले उद्योजक , व्यावसायिक यांच्या तब्बल 100 हून अधिक मुलाखती घेतल्या आहेत. (MLA Rahul Kul News) या उद्योजकाची यशोगाथा लवकरच पुस्तक स्वरूपात छापली जाणार आहे. यांचा सर्व तरुण पिढीला फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : कापडी पिशव्या वापरा, पर्यावरण वाचवा : भैरवनाथ शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब ढमढेरे
Daund News : “अमृत भारत” योजनेत दौंड रेल्वे स्थानकाचा समावेश; जंक्शनचा होणार विकास