गणेश सुळ
Daund News : केडगाव : सध्या राज्यामध्ये बेरोजगारीच्या समस्येसोबत तरुणांच्या लग्नाचा प्रश्न खूपच गंभीर होत चालला आहे. अशामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न होत नसल्याची बाब समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाही ही आता एक सामाजिक समस्या झाली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नासाठी सरकार किंवा कोणत्या संघटना प्रयत्न करणार आहेत काय, असा प्रश्न निर्माण होत होता. यावर प्रहार क्रांती अपंग संघटना पुढे आली आहे.
समस्या सोडविण्यासाठी प्रहार क्रांती अपंग संघटनेचा पुढाकार
प्रहार क्रांती अपंग संघटनेने सांगितले की, शेतकरी मुलांसोबत लग्न करणाऱ्या मुलीच्या नावावर राज्य सरकारने 10 लाख रुपये आणि मुलीच्या वडिलांच्या नावावर 5 लाख रुपये ठेवण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली होती. परंतु, ही मागणी अजून कागदावरच राहिली आहे. (Daund News) राज्यातील शेतकरी मुलांच्या लग्नाचा प्रश्न हा खूपच गंभीर झाला आहे. शेतकरी नवरा नको, अशीच शपथ मुलींनी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात मुलं बिनलग्नाची राहिली आहेत.
शेतकरी मुलांचे वय 35 ते 40 च्या वर गेले तरी देखील त्यांना मुली मिळत नाहीत. त्यामुळे राज्यातील शेतकरी मुलांमध्ये नैराश्येचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूरातील अविवाहित तरुणांनी नवरदेव मोर्चा काढला होता. ‘कोणी मुलगी देता का मुलगी’, असं म्हणत या तरुणांनी घोड्यावरुन वरात काढत थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. (Daund News) डोक्यावर मुंडवळ्या, डीजे लावत घोड्यावर बसू वरात काढात या तरुणानी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला होता. हे सर्व तरुण सुशिक्षित आहेत, पण बेरोजगारीमुळे त्यांना नोकरी मिळत नाहीये. नोकरी नसल्यामुळे त्यांचे लग्न होत नाही. त्यांची हिच समस्या सरकारला कळावी यासाठी त्यांनी हा मोर्चा काढला होता.
दरम्यान, कर्नाटकात देखील शेतकरी मुलांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात हा मुद्दा उचलून धरला गेला होता. एका नेत्याने आमचे सरकार आले तर शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न केल्यास तरुणींना दोन लाख रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. पण तेही आश्वासनच राहिले. (Daund News) यासाठी सरकारने उपाययोजना आखणे गरजेचे आहे, असे प्रहार क्रांती अपंग संघटना, रयत क्रांती संघटना, शेतकरी वर्ग तसेच तरुण वर्ग यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : गुळाचा टेम्पो उलटला; ढेपेखाली गुदमरून चालकाचा मृत्यू
Daund News : राजेगाव परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…