अरुण भोई
Daund News : राजेगाव : पावसाळा संपला आणि आता परितीचा पाऊस सुरु झाला मात्र अजूनही राजेगाव परिसरात एकही म्हणावा तसा पाऊस झाला नाही. मान्सूनच्या पावसावर शेतकरी वर्गाचे पेरणी केली. मात्र पिके काशितरी उगून आली, आता त्या पिकांना मरगळ आलेली आहे. त्यांना पाणीच मिळाले नाही. या भागात पाऊसच नसल्याने भूगर्भातील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. त्यामुळे येथील नागरिक अध्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.
निसर्गाच्या कोपाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले
चालू वर्षात निसर्गाच्या कोपाने शेतकऱ्याचे चांगलेच कंबरडे मोडले. अगोदर गारपीट, नंतर अवकाळी यांमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. फळबागा,खरीप पिके, ऊस,ओला चारा इत्यादीचे तर अतोनात नुकसान झालेले आहे. यामधून शेतकरी कधी सावरणार नाही, त्यांची आर्थिक परिस्थिती डगमगलेली पाहायला मिळत आहे.
गेल्या वर्षी परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले होते. त्यात शासन स्तरावरूनही शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर झाली होती आणि ती मिळालीही. (Daund News) मात्र यंदाचा मान्सून जगण्याची उमेद देईल अशी अपेक्षा करत शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मान्सून पूर्व मशागती करून घेतल्या.
अगोदरच खते, बी-बियाणे खरेदी करून ठेवले आहे. आणि सुरवातीच्य पावसाच्या ओलीवर कशाबशा पेरणी केल्या. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा शेतकरी वर्गाकडून केली जात होती. तालुक्यातील काही भागाला वरदायिनी ठरलेली भीमा नदीची पाणी पातळी खूप खालावलेली आहे. तर या परिसरातील विहिरी,कुपनलिका कोरड्याच झाल्या आहेत.
दरम्यान, दरवर्षी मान्सून आगमना वेळी भीमा नदी बऱ्यापैकी वाहते. मात्र यंदाचा देखावा जरा वेगळाच आहे. हा पाणी साठा अल्प असल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे. भीमा नदीच्या पाण्यावर हजारो हेक्टर शेती व मानवी जीवन अवलंबून आहे. (Daund News) आता उजनी धरणात फक्त पंधरा टक्के पाणी साठा राहिलेला आहे. तो किती दिवस पुरेल यांची चिंता शेतकरी बांधवांना लागली आहे.
राजेगावाला भीमा नदी पात्र मोठ्या प्रमावर लाभले आहे. मात्र यंदा ते भरेल का नाही याची शासवती नाही. अशी परिस्थिती दहा वर्षपूर्वी निर्माण झाली होती. पावसाने दडी मारल्याने आर्थिक नियोजन कोलमडले आहे. शेतकरी बांधवानी आपले आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे.
मनोज भोसले (प्रगतशील शेतकरी राजेगाव)
यंदा पावसाने दडी मारल्याने शेतीचे नियोजन बिगडले आहे. तसेच उत्पादन कमालीची घट झाली आहे. हे नुकसान भरून येणे शक्य नाही. याचा फटका शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावत बसला आहे. शेतीच्या उत्पन्नावर इतर आर्थिक व्यवहार ठरले जातात.
भारत खराडे (संचालक – दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : सोरतापवाडी येथील वाहन चालकाला पाटस टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण!