राहुलकुमार अवचट
Daund News : यवत : दौंड तालुक्यातील विजेच्या विविध समस्यांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार ॲड. राहुल कुल यांनी नुकतीच मुंबई येथे भेट घेतली. यावेळी महावितरण, महापारेषण विभागाच्या संबंधित विविध समस्या, दौंड तालुक्यातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
देवेंद्र फडणवीस यांचे संबंधित विभागाला कार्यवाहीचे निर्देश
आमदार ॲड. राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील अतिभारीत उपकेंद्र व प्रस्तावित उपकेंद्रांसाठी तातडीने आवश्यक अतिउच्चदाब वाहिन्या व इतर पायाभूत सुविधा, निर्माण करण्यात याव्यात. (Daund News ) दौंड तालुक्यातील राजेगाव, बोरीऐंदी, भांडगाव, वडगाव बांडे, रोटी, पडवी, कुरकुंभ, कानगाव, खुटबाव, व देऊळगांव गाडा आदी ठिकाणी नवीन वीज उपकेंद्रे उभारण्यात यावे, अशी मागणी केली.
तसेच दौंड तालुक्यातील पाटस, सहजपूर, रावणगाव, देऊळगाव राजे, कुरकुंभ, दहिटणे,bपिंपळगाव आदी ३३/११ केव्ही उपकेंद्रांची क्षमतावाढ करण्यात यावी, याठिकाणी विजेची गरज लक्षात घेता अतिरिक्त रोहित्रे बसविण्यात यावीत. पारगाव, १३२/३३/२२ केव्ही, पारगाव उपकेंद्र – ११ केव्ही, पारगाव फिडर, ३३/११ केव्ही, पारगाव गावठाण फिडर, ३३/११ केव्ही, केडगाव उपकेंद्र – ११ केव्ही, केडगाव फिडर, १३२/३३/२२ केव्ही, यवत उपकेंद्र- २२ केव्ही, पिंपळगाव फिडर ३३/११ केव्ही, हातवळण फिडर, ३३/११, शिंदेवाडी फिडर, ३३/११ केव्ही, दौंड उपकेंद्र- २२ केव्ही आदींचा आरडीएसएस फिडर सेप्रेशन योजनेत समावेश करण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या केल्या.
दरम्यान, आमदार ॲड. राहुल कुल यांनी केलेल्या मागण्यांची दखल घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.(Daund News ) यावेळी आमदार जयकुमार गोरेही उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : यवत पोलीस स्टेशनवर गोरक्षकांचा ‘चिल्लर फेक’ मोर्चा; पोलीस प्रशासनाचा निषेध
Daund News : दौंड नगरपरिषदेच्या प्रकल्प अभियंत्यास दहा हजारांची लाच घेताना अटक