गणेश सुळ
Daund News : केडगाव : जगात कोरोनाने धैमान घटले होते. जवळपास तीन वर्ष पर्यंत कोरोना सदुश्य परस्थिती होती. त्यातच धंदे, व्यवसाय ठप्प झाले होते. अशा काळापासून पूणे जिल्हा परिषदेने दिव्यांगाचा विचार न करता अतिशय लाजिरवाणी पने दिव्यांग बांधवांना शासनाच्या विवीध योजनेपासून वंचित ठेवले. यासाठी जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर विवीध मागण्याच्या अनुषंगाने जिल्यातील दिव्यांग बांधवांनी बेमुदत उपोषण व आंदोलन केले होते.
यामध्ये दिव्यांग कायदा 2016 अंमलबजावणी व्हावी,100 टक्के घरपट्टी माफी, यशवंत घरकुल योजनेचा लाभ, व निधीत वाढ, दिव्यांगचा निर्वाह भत्ता अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या होत्या. (Daund News) यासाठी जिल्हा परिषद पुणे या ठिकाणीं प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचे मा जिल्हा अध्यक्ष महेंद्र निंबाळकर यांच्या मार्गदर्शना खाली उपोषण व आंदोलन झाले.
सर्व मागण्या मान्य
शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे यांच्या पुढाकाराने सर्वच्या सर्व मागण्या मान्य करुन पुणे जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी गावडे समाजकल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी घाडगे यांच्या हस्ते लेखी अश्वासन दिल्या नंतर उपोषण मागे घेण्यात आले उपस्थित (Daund News) महेंद्र निंबाळकर जिल्हा उपाध्यक्ष ,सुरेश जगताप दौंड तालुका अध्यक्ष बाळासाहेब नानवर बारामती तालुका अध्यक्ष मृत्युंजय सावंत पुरंदर तालुका अध्यक्ष फिरोज पठाण दिलीप भोसले पुरंधर तालुका संपर्क प्रमुख काशिनाथ आण्णा जगताप हनुमंत तात्या नेटके दौंड तालुका सचिव दिलीप यादव ,प्रहार पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय तरटे , प्रहार पतसंस्थेचे संस्थापक तुषार हिरवे पाटस शाखा अध्यक्ष हनुमंत शितोळे , तुकाराम सुतार नारायण , अवचर थिटे महाराज, इत्यादी मान्यवर व पुणे जिल्ह्यातील दिव्यांग महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थीत होते .
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : तुषार दादा थोरात युथ फाऊंडेशनचा वाहनचालकांसाठी अनोखा उपक्रम..