Daund News : पुणे : राष्ट्रवादीमधून अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. त्यानंतर स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील अनंतराव पवार इंग्लिश मीडियम शाळेच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे पहिल्यांदाच एका मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. मात्र, या वेळी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात अबोला पाहायला मिळाला.
ही लढाई वैचारिक आहे, वैयक्तिक नाही
याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, प्रत्येकाची एक वैचारिक बैठक असते आणि एक कौटुंबिक बैठक असते. (Daund News) आमच्यामध्ये विचारांची प्रगल्भता आली आहे. आमची लढाई भाजपच्या विचारधारेविरोधात, धोरणांच्या विरोधात आहे. ही लढाई वैचारिक आहे, वैयक्तिक नाही. शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली; मात्र, बोलणं झालं का?, असे विचारले असता, डायलॉग इस मस्ट, असे उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले.
दरम्यान, आज शरद पवार यांचा सोलापूर दौरा होता. हा दौरा अचानकपणे रद्द झाला. यावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले की, हा दौरा का रद्द झाला, याबाबत मला नेमकी माहिती नाही. मात्र, कदाचित इंडिया आघाडीची बैठक असावी. मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, समाजात अस्वस्थता असेल तर राज्य सरकारने दखल घ्यावी. एक सर्वपक्षीय बैठक बोलवावी. (Daund News) तरुणांनी, कृपया करून आत्महत्या करू नका. अनेक घटक आरक्षण मागत आहेत. या सगळ्यांबद्दल एक विशेष अधिवेशन बोलवा. राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी. राज्य प्रचंड अस्थिर आहे. सरकारने याची दखल घ्यावी, ठोस पावले उचलावीत. खोके सरकार फक्त खोक्याचा धंदा करतेय. देवेंद्र फडणवीस जबाब दो… गृहमंत्री यांना महाराष्ट्राला उत्तर द्यावेच लागेल, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : नाथचीवाडी गावचे सर्वसमावेशक नेतृत्व सरपंच सारिका चोरमले