गणेश सुळ
Daund News : केडगाव : गावागावातील सरपंचांनी गावाच्या विकासाची कास धरून विकासाची गंगा गावात पोहचविण्यासाठी ग्रामस्थांना बरोबर घेऊनच विकास साधण्याचा प्रयत्न केला तर निश्चित गावचा विकास होतो. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे नाथचीवाडी गावच्या सरपंच सारिका अनिल चोरमले. सारिका चोरमले यांची यशोगाथा कोणताही राजकीय वारसा नसताना दिपवणारी आहे.
सारिका चोरमले यांची यशोगाथा दिपवणारी
आदर्श सरपंचापर्यंत त्यांची दमदार कामगिरी आज त्यांच्या कर्तृत्वातून नाथचीवाडी गावच्या विकासातून दिसून येत आहे. सरकारच्या अनेक योजनांचा निधी गावात आणून आपल्या गावचा कायापालट या थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच सारिका चोरमले यांनी केला आहे. (Daund News) त्यांनी आपल्या कारकीर्दीत गावचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी याच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रामुख्याने भर दिला आहे.
गावात शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी जलजीवन मिशन योजना, गावासह वाडी वस्तीवरील रस्त्याचे डांबरीकरण, काँक्रीटीकरण, बंदिस्त गटार लाईन, (Daund News) स्मशानभूमीतील उपाययोजना, सार्वजनिक ठिकाणी शौचालय, सौर दिवे, हायमास्ट दिवे, पेव्हींग ब्लॉक, मंदिर परिसर विकास, महिला सबलीकरण, बचत गट योजना असे अनेक योजना आपल्या कारकीर्दीत राबविल्या.
तसेच कोरोनासारख्या जागतिक महामारीत वेगवेगळ्या वस्तू वाटप, औषध फवारणी, शासकीय नियमांचे पालन करून अनेक अडीअडचणींना सामोरे जाऊन गावासाठी चांगले काम करण्याची जिद्द सरपंच सारिका अनिल चोरमले यांनी बाळगली.
गावासाठी चांगले काम करण्याची जिद्द सरपंचाच्या अंगात असावीच
ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांना समजून घेऊन गावात विविध विकास योजना राबवून गाव सर्व बाबतीत कसे समृद्ध करता येईल त्याकडे जातीने लक्ष दिले. कारण सरपंचपदाचा कालावधी हा केवळ काही वर्षांचा आहे. या कालावधीत आपण जे काम करू त्याच कामावरून आपली ओळख कायम गावकऱ्यांना आठवण करून देईल. गावात हे चांगले काम झाले. ते कोणत्या सरपंचाच्या कार्यकाळात झाले. त्यावरूनच आपली ओळख कायमस्वरूपी लोकांच्या लक्षात राहील. गावात विकासकाम करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र, येणाऱ्या प्रत्येक अडीअडचणीला सामोरे जाऊन गावासाठी चांगले काम करण्याची जिद्द सरपंचाच्या अंगात असायलाच हवी.
– सारिका अनिल चोरमले, सरपंच, नाथचीवाडी (दौंड)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखत धनगर समाजाने दिला ‘हा’ इशारा
Daund News : ग्रामपंचायत निवडणुकांमुळे तापू लागले दौंड तालुक्यातील राजकीय वातावरण