Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखत धनगर समाजाने दिला ‘हा’ इशारा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 21 October 2023, 18:25

संदीप टूले
Daund News : केडगाव  : राज्यातील धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी, व येत्या पंधरा ते वीस दिवसात ठोस निर्णय घ्या, नाहीतर धनगर समाज बांधवांना एसटीचे प्रमाणपत्राचे वाटप करा, अन्यथा राज्यातील धनगर समाज राज्यातील प्रस्तापित राजकारणांचे राजकीय चित्र बदलून टाकेल. असा थेट इशारा धनगर समाज युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष घनशाम हाके यांनी सरकारला दिला.

धनगर समाज राज्यातील प्रस्तापित राजकारणांचे राजकीय चित्र बदलून टाकेल  

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षण मिळावे, त्याची त्वरित अंमलबजावणी करावी. या मागणीसाठी महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या नेतृत्वाखाली शनिवारी (ता.२१) पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील पाटस येथील टोल नाक्यावर तब्बल दिड ते दोन तास महामार्गावरील दोन्ही बाजुची वाहने अडवून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. (Daund News) पाटस येथील राजमाता अहिल्याबाई होळकर चौक ते पाटस टोल नाक्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. पाटस टोलनाक्यावर हा मोर्चा आल्यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

यावेळी बोलताना घनश्याम हाके म्हणाले, सन २०१४ ला तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाचे पुढे काय झाले? १० वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तेवर होते आणि आता ९ वर्षे भाजप सत्तेवर आहे.या दोन्ही सरकारने धनगर समाजाची फसवणूक आणि विश्वासघात केला आहे. त्यामुळे या चोरांवर विश्वास ठेवावा कसा ? यांना धनगर समाजाची मते चालतात मात्र धनगर समाजाला आरक्षण देता येत नाही. मात्र, पुढील १५ ते २० दिवसांच्या आत सरकारने ठोस निर्णय घ्यावा, धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी. तसे न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीत धनगर समाज सरकारला त्यांची जागा दाखवून देईल आणि त्याची सुरुवात दौंड आणि बारामती मतदार संघातून होईल. असे हाके यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दरम्यान, प्रत्येक मतदारसंघात धनगर समाजाचा उमेदवार रिंगणात उभे राहील. हे लक्षात घ्या, दौंडच्या आमदारांनी या आंदोलनाच्या ठिकाणी येणे अपेक्षित होते. (Daund News) दौंड तालुक्यात धनगर समाज ७० हजार आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत दौंडच्या आमदारांची बत्ती गुल होऊ शकते. धनगर समाजाला एवढ्या हलक्यात घेऊ नका. असाही इशारा घनःश्याम हाके यांनी बोलताना दिला.

 

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, धनगर समाजाचे नेते रामकृष्ण बिडगर ,राष्ट्रीय समाज पक्षाचे शिरूर तालुका अध्यक्ष शिवाजी कोऱ्हाडे यांची भाषणे झाली. (Daund News) या आंदोलनात राष्ट्रीय समाज पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष चेतना पिंगळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे संपर्कप्रमुख सतीश तागड, संतोष टेळे, सुभाष कोळपे, गोकुळ पिंगळे यांच्यासह दौंड, बारामती, हवेली, शिरूर तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Daund News : ग्रामपंचायत निवडणुकांमुळे तापू लागले दौंड तालुक्यातील राजकीय वातावरण

Daund News : तीन टप्प्यात 4 किमीचे काम झालं पण ‘ते’ 50 मीटरचं अंतर राहिलं; देलवडी ते इनामके वस्ती रस्त्याची दुरवस्था

Daund News : दौंड तालुक्यातील विजेचा प्रश्न लागणार मार्गी; उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी आमदार कुल यांची सकारात्मक चर्चा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ऐन सणासुदीत सोनं ३ हजारांनी घसरलं! दसरा-दिवाळीत सोन्या-चांदीचे भाव आणखी उतरणार? मोठी अपडेट समोर, वाचा सविस्तर

Sunday, 4 October 2026, 20:40

‘अंधभक्तीचा चरस-गांजा आम्ही उतरवू, मी पंतप्रधान झालो तर…’ पुण्यातल्या आंदोलनात संजय राऊतांचा मिश्किल टोला…

Sunday, 4 October 2026, 20:31

माढा तालुक्यातील ‘तुळशी’ गावाला पालकमंत्र्यांकडून मोठा दिलासा! ३.५ कोटींची पाणीयोजना मंजूर; दुष्काळामुळे विकायला काढलं होत गाव…

Sunday, 4 October 2026, 19:50

पुणे हादरलं! कात्रज-कोंढवा रोडवर तरुणाचा खून; दारुपार्टीत वाद अन् मित्रानेच काढला काटा

Sunday, 4 October 2026, 19:33

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

Sunday, 4 October 2026, 17:41

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09
Next Post

Pune News : पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात रंगला भोंडला महोत्सव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp