गणेश सुळ
Daund News : केडगाव : केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या सप्टेंबर महिन्यापासून राज्यात ‘आयुष्मान भव’ ही आरोग्यविषयक मोहीम राबविण्यात येत आहे. अशीच एक मोहीम दौंड तालुक्यातील नानगाव प्राथमिक आरोग्य केंद्र याच्या अधिपत्यात येणाऱ्या देलवडी उपकेंद्रात ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये आबालवृद्धांच्या तपासण्या करण्यात आल्या.
लाभार्थ्यांच्या अनेक तपासण्याही पूर्ण
‘आयुष्मान भव’ या उपक्रमामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्मान कार्डांचे वितरण करण्यात आले. तसेच आरोग्यविषयक सेवा-सुविधांची जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मेळावा ही घेण्यात आला. आयुष्मान कार्ड व आभा कार्ड यांबाबत जनजागृती, आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, लसीकरण व क्षयरोगाबाबत जागृती करण्यात आली. (Daund News) ‘आयुष्मान मेळावा’अंतर्गत मधुमेह, ताणतणाव, रक्तदाब, विविध प्रकारचे कॅन्सर, कुष्ठरोग, क्षयरोग, कुपोषण, नेत्रचिकित्सा यांबाबत चार आठवड्यांमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. याच दरम्यान सर्व अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची विशेष मोहीम राबवून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या मुलांची सामान्य आजारांची तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहेत. आवश्यकता भासल्यास या मुलांच्या जिल्हास्तरावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे आरोग्य सेवक नेवसे यांनी यावेळी सांगितले.
सर्वानुमते प्रतिज्ञा करण्यात आली की मी माझ्या मृत्युनंतर अवयव व उतीचे दान करेल व इतरांनाही यासाठी प्रेरित करेल. जेणेकरून देशवासियांना याचा फायदा होईल. या कार्यक्रमासाठी सरपंच निलम काटे, ग्रा. पं. सदस्य लक्ष्मण जाधव, (Daund News) अर्जुन वाघोले, अविद्या अडगळे, गिरिधर शिर्के, आरोग्यसेवक रानू नेवसे, आरोग्य सेविका रेखा टुले ,आशासेविका सुधामती भालेराव, मंगल अडागळे, मेघना शेलार, संगिता बंड, वनिता भिसे, सुनीता थोरात व लाभार्थी उपस्थित होते.
सर्व आरोग्य योजनांचे लाभ तळागाळातील लाभार्थ्यासह, प्रत्येक इच्छित लाभार्ध्यपर्यंत अधिक चांगल्याप्रकारे पोहचावेत यासाठी आरोग्य मंत्रालय यांनी हा आयुष्मान भव हा कार्यक्रम हाती घेतला आहे.
– रेखा टुले, आरोग्यसेविका, उपकेंद्र देलवडी.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : देलवडी गावच्या माजी उपसरपंच सुलोचना विष्णुपंत शेलार यांचे अल्पशा आजाराने निधन
Daund News : दिशा प्रतिष्ठानचा ‘कृतिशील क्रीडा मंडळ’ पुरस्काराने गौरव
Daund News : आजी-आजोबांसोबत नातवंडांनी केली धमाल-मस्ती; देलवडी, राहू येथील शाळेत रंगला आनंद मेळावा