अरुण भोई
Daund News : राजेगाव : दौंड तालुक्यातील राजेगावमधील श्री राजेश्वर विकास सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी मधुकर जामले तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब ढेंबरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
संस्थेचा कारभार पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करणार, नवनिर्वाचित उपाध्यक्षांची प्रतिक्रीया
निवड बिनविरोध करण्यासाठी गटनेते मुकेश गुणवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भारत खराडे, महेश कडू आणि सर्व संचालक मंडळाने प्रयत्न केले. या वेळी नवनिर्वाचित अध्यक्ष जामले म्हणाले की, आमदार राहुल कुल (Daund News) आणि गटनेते मुकेश गुणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या हिताची कामे केली जाणार आहेत. सभासदांना कर्जपुरवठा, संस्थेचा नफा-तोटा याकडे अधिक लक्ष दिले जाईल.
भविष्यात संस्थेचा कारभार पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करणार, तसेच शेतकरी बांधवांना संस्थेचा अधिकाधिक लाभ घेता यावा, याकडे अधिक लक्ष देणार,(Daund News) अशी प्रतिक्रीया नवनिर्वाचित उपाध्यक्षांनी व्यक्त केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंड तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; निर्यात शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी