गणेश सुळ
Daund News : केडगाव : खुटबाव विवीध कार्यकारी सोसायटी या संस्थेच्या वतीने खुटबाव (ता. दौंड) येथे लवकरच जनरीक मेडिकल सुरू करणार आहे. असे आश्वासन दौंड चे माजी आमदार रमेश थोरात यांनी दिले आहे.
खुटबाव सोसायटीच्या सभेत दिले आश्वासन
खुटबाव (ता. दौंड) विवीध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी बोलताना वरील आश्वासन माजी आमदार रमेश थोरात यांनी दिले. यावेळी खुटबाव सोसायटीचे अध्यक्ष महेश थोरात, उपाध्यक्ष सुनील फणसे, संचालक भाऊसाहेब ढमढरे, जी.के. थोरात, नवनाथ थोरात, आर. डी. थोरात, संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आमदार रमेश थोरात म्हणाले कि, देशात सर्वसामान्य जनतेला, परवडणाऱ्या किमतीला उत्तम दर्जाची औषधे आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध व्हावीत, (Daund News) या उद्देशाने, केंद्रीय खते आणि रसायने मंत्रालयाच्या औषधनिर्माण विभागाने २००८ साली प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना सुरु केली.
दरम्यान,या योजनेअंतर्गत, नागरिकांना स्वस्त दरात, उत्तम दर्जाची जेनेरिक औषधे विकत घेता यावीत यासाठी (Daund News) देशभरात अनेक ठिकाणी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र या नावाने औषधांची दुकाने सुरु करण्यात आली. मार्च २०२५ पर्यंत देशभरात अशी १० हजार ५०० केंद्रे सुरु करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.