गणेश सुळ
Daund News : केडगाव : देलवडी येथील सुलोचना (माई) विष्णूपंत शेलार (वय ५६) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्या भीमा सहकारी साखर कारखान्याचे मा. संचालक स्व. विष्णूपंत शेलार यांच्या पत्नी होत. तसेच त्या देलवडी गावच्या मा. उपसरपंच, तसेच देलवडी वि.का.स. संस्थेच्या विद्यमान संचालिका देखील होत्या.
पुण्यातील हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास
सुलोचना शेलार या परिसरात माई या नावाने ओळखले जात. माई यांनी संसाराबरोबरच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध प्रकारच्या शेत्रात काम करताना पंतांची धीराने साथसोबत केली. (Daund News) त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
सुलोचना शेलार यांचा दशक्रिया विधी कार्यक्रम गुरुवारी 21 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता देलवडी मुळा मुठा नदी काठी होणार असल्याचे सांगण्यात आले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दिशा प्रतिष्ठानचा ‘कृतिशील क्रीडा मंडळ’ पुरस्काराने गौरव
Daund News : आजी-आजोबांसोबत नातवंडांनी केली धमाल-मस्ती; देलवडी, राहू येथील शाळेत रंगला आनंद मेळावा