गणेश सुळ
Daund News : केडगाव : माणूस कितीही मोठा झाला तरी गावाची असलेली नाळ कधीच विसरत नाही, याची प्रचिती शनिवारी (दि.७) दौंड तालुक्यातील देलवडी गावच्या ग्रामस्थांनी अनुभवली. पोपटराव शेलार उद्योजक राहणार देलवडी.
आमदार राहुल कुल आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते लोकार्पण
सध्या मुंबईत ते राहत आहेत. त्यांनी त्यांची आई सरुबाई रघुनाथ शेलार यांच्या स्मरणार्थ आपल्या गावातील नागरिकांसाठी 24 तास मोफत सेवा पुरविण्यासाठी एक रुग्णवाहिका भेट दिली. कारण एकच की आपल्या देलवडी, एकेरीवाडी गावातील एकाही रुग्णची गैरसोय होऊ नये. ( Daund News ) कारण मागील कोरोना काळात असंख्य रुग्णांना रुग्णवाहिकेवाचून प्राण गमवावे लागले होते म्हणून या अवलियाने गावातील लोकांची गरज ओळखून मोफत रुग्णवाहिकेची सोय केली. त्याचे लोकार्पण दौंड तालुक्याचे आमदार आरोग्यदुत राहुल कुल आणि त्यांच्या पत्नी कांचन कुल याच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी बोलताना राहुल कुल म्हणाले की, संकटकाळात आपल्याच समाजाच्या मदतीसाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन आपली मातेबद्दल असलेली संवेदनशीलता, कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे मोलाचे कार्य पोपटराव शेलार यांनी केले आहे. (Daund News) आरोग्य सेवा हीच खऱ्या अर्थाने र्ईश्वर सेवा आहे. पोपटराव हे खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करण्याचे काम करत आहे. आरोग्य सुविधेसाठी सर्व सोयींनीयुक्त रुग्णवाहिका दिल्याने पोपटराव शेलार यांचे या अनोख्या दातृत्वाबद्दल ज्येष्ठ साहत्यिक, लेखक, गीतकार प्रवीण दवणे यांनी कौतुक केले.
या कार्यक्रम प्रसंगी आमदार राहुल कुल, जेष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे, भाजपच्या महिला प्रदेशध्यक्षा कांचन कुल, मोरया उद्योग समूहाचे अध्यक्ष माऊली ताकवणे भीमा पाटसचे संचालक विकास शेलार, तुकाराम ताकवणे बाळासाहेब तोंड, माजी संचालक संजय इनामके ,शिवाजी वाघोले, बाळासाहेब थोरात,नरेंद्र काटे, तुकाराम वांझरे देलवडीच्या सरपंच निलम काटे, पारगावच्या सरपंच जयश्री ताकवणे, उपसरपंच ताराबाई टकले आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.(Daund News) या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमा पाटसचे संचालक विकास शेलार यांनी केले तर आभार पोपटराव शेलार यांनी मानले.