संदीप टूले
Daund News : केडगाव : दौंड तालुक्यातील रहिवाशी असलेल्या, परंतु कामानिमित्त हडपसर येथे स्थायिक झालेल्या नागरिकांचा ‘दौंड रहिवासी संघ’ आयोजित स्नेह मेळावा शेवाळवाडी, हडपसर येथे झाला. यावेळी दिशा प्रतिष्ठान क्रीडा मंडळाला सात वर्षांच्या काळात उत्कृष्ट खेळाडू घडवल्याबद्दल कृतिशील क्रीडा मंडळ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला पुरस्कार वितरण सोहळा
या वेळी आमदार राहुल कुल, जिल्हा बँकेचे संचालक माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश घुले, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, हरिभाऊ ठोंबरे, हेमलता परदेशी, नितीन दोरगे, धनाजी शेळके, नीलकंठ शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
दिशा प्रतिष्ठान या संस्थेची सुरुवात ८ एप्रिल २०१६ रोजी झाली. आजपर्यंत प्रतिष्ठानतर्फे जिल्हा, राज्य पातळीपर्यंत ग्रामीण भागातील अनेक खेळाडू खेळले असून, मागील वर्षी या प्रतिष्ठानच्या २५ मुली राज्य पातळीवर तर ५ मुले विभागीय स्तरावर खेळले आहेत. पुणे लीग कब्बडी स्पर्धेमध्ये ५ मुली व २ मुलांची निवड झाली तसेच राज्यस्तरावरील कबड्डी स्पर्धेमध्ये या प्रतिष्ठानचे २ पुरुष व २ महिलांची संघ प्रशिक्षक म्हणून निवड झाली. प्रतिष्ठानचे २ खेळाडू राष्ट्रीय पातळीपर्यंत गेले आहेत.(Daund News) तर प्रतिष्ठानचे १७ खेळाडू पोलीस दलामध्ये भरती झाले आहेत. विशेष म्हणजे हे सारे खेळाडू ग्रामीण भागातील असून, त्यांना घडविण्यात दिशा प्रतिष्ठानचे मोलाचे योगदान होते. यामुळे त्यांना यावर्षी कृतिशील क्रीडा मंडळ म्हणून गौरविण्यात आले.
या यशाविषयी बोलताना प्रशिक्षक महादेव टकले म्हणाले की, आम्ही ७ वर्षे केलेल्या कामाची पावती म्हणून दौंड रहिवासी संघाने आमचा सन्मान केला. (Daund News) यामुळे आमचे मनोबल नक्कीच वाढले आहे. यापुढे दौंडच्या भूमीतील खेळाडू घडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : आजी-आजोबांसोबत नातवंडांनी केली धमाल-मस्ती; देलवडी, राहू येथील शाळेत रंगला आनंद मेळावा