संदीप टूले
Daund News : दौंड: दौंड तालुक्यातील शेतकरी कांदा सध्या ट्रकद्वारे थेट तेलंगणात विक्रीला पाठविला जात आहे. पुणे जिल्हातील कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. तसेच व्यापाऱ्यांकडून होत असलेली आर्थिक फसवणूक, ‘नाफेड’ची कागदोपत्री खरेदी यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा कांदा ट्रकद्वारे थेट तेलंगणात विक्रीला पाठविला जात आहे. त्यामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रात चांगलेच चर्चेत आले आहे.
हजार बाराशेंचा दरात फ़रक
हजार-बाराशेंची दरात तफावत तसेच महाराष्ट्रात कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा ओढा कांदा विक्रीसाठी तेलंगणात पाठविण्याकडे कल वाढला आहे. (Daund News) पुणे जिल्ह्यात कांद्याला सरासरी ६०० ते ८०० रुपयांपर्यंत भाव मिळतोय. मात्र, त्याच कांद्याला तेलंगणामध्ये १८०० ते दोन हजार रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने दळणवळणचा खर्च वगळता एक हजार रुपये प्रतिक्विटंल आर्थिक फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे कांदा तेलंगणात पाठविण्यात आहोत. असे शेतकरी म्हणाले.
‘अब की बार किसान सरकार’चा नारा दिल्यानंतर ‘केसीआर’ यांनी आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे पीक असलेल्या कांद्याच्या मुद्द्याला हात घालत (Daund News) पश्चिम महााष्ट्रातील राजकारणात प्रवेश करण्याची चांगलीच तयारी केली आहे असे दिसून येते भारत राष्ट्र समितीने मराठवाडा आणि विदर्भातील राजकीय वर्तुळात खळबळ उडविल्यानंतर आता भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांनी पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळवून कांदा दराआडून राजकीय ‘वांधा’ निर्माण करतील का ?….अशी राजकीय चर्चा चालू झाली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : पुणे जिल्हा हळहळला! दिवेकर कुटुंबीयांना अखेरचा निरोप
Daund News : दौंडच्या तहसिलदारपदी अरुण शेलार; नियुक्ती होताच तातडीने स्वीकारला पदभार