संदीप टूले
Daund News : दौंड : दौंड तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान जानेवारी 2023 पासून संबंधित लाभार्थ्यांना मिळाले नसल्याने त्याबाबत आम आदमी पार्टीचे रवींद्र जाधव यांनी अपर जिल्हाधिकारी पुणे ज्योती कदम यांच्याकडे अनुदान लाभार्थ्यांना मिळण्यासाठी मागणी केली आहे. (Beneficiaries of Daund taluka deprived of benefits of Sanjay Gandhi Niradhar Yojana…)
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींवर उपासमारीची वेळ
या संपूर्ण प्रवर्गातील सर्व लाभार्थी हे विधवा, निराधार, अपंग व ईतर लाभार्थी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहत आहेत त्यांचे जानेवारी पासून चे अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे (Daund News) तरी लवकरात लवकर अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा करावे अशी मागणी आम आदमी पार्टीचे रवींद्र जाधव यांनी केली आहे.
या बाबत दौंड चे प्रभारी तहसीलदार अजित दिवटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की शासनाकडून अजून आमच्याकडे अनुदान प्राप्त झाले नाही म्हणून आम्ही संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करू शकलो नाही. (Daund News) अनुदान प्राप्त होताच संबंधित लाभार्थ्यांना ते वितरित करण्यात येईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : बारामती लोकसभा मतदार संघाची आमदार राहुल कुल यांच्याकडे धुरा …
Daund News : 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा दौंड शहरात मोठ्या उत्साहात साजरा
Daund News : केडगाव ग्रामपंचायत मधील वाद पुन्हा उफाळला ; जाचक अटीमुळे वाद