संदीप टूले
Daund News : दौंड : महाराष्ट्रातील सर्व ४८लोकसभा मतदासंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली असून यामध्ये दौंड चे आमदार राहुल कुल यांच्याकडे बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपाची लोकसभेची तयारी सुरू
भाजपाने लोकसभेची लवकरच तयारी चालू केली आहे. कारण मागील लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभेसाठी ऐनवेळी कांचन कुल यांना उमेदवारी मिळाली व त्यावेळी मतदार संघात कमी वेळ मिळाला त्या कमी वेळेत योग्य नियोजन करून कांचन कुल यांनी पवारांना बारामती मतदारसंघात गुंतून ठेवण्यात यश मिळवले होते व कडवी झुंज देत तगडे आव्हान निर्माण केले होते. (Daund News) त्यामुळे आगामी बारामती लोकसभेची जबाबदारी आमदार राहुल कुल यांच्याकडे दिल्यामुळे दौंड तालुक्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. असे आमदार राहुल कुल यांचे कार्यकर्ते छातीठोक पणे सांगत आहे.
पुणे जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट असलेला मतदार संघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ होय. या मतदार संघाची जबाबदारी आपल्या दौंड चे आमदार राहुल कुल यांच्याकडे दिल्याने जिल्ह्यात त्यांची ताकत वाढली आहे हे यावरून निश्चित होते.
श्विकास शेलार (संचालक भीमा पाटस स.सा कारखाना)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा दौंड शहरात मोठ्या उत्साहात साजरा
Daund News : केडगाव ग्रामपंचायत मधील वाद पुन्हा उफाळला ; जाचक अटीमुळे वाद