गणेश सुळ
Daund News केडगाव : दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांची काही दिवसांपूर्वी बदली झाल्यानंतर प्रभारी तहसीलदार म्हणून आलेले अजित दिवटे यांचीही बदली झाली. (Daund News) त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दौंडला तहसीलदार नसल्याने कामे रखडली होती. (Daund News) मात्र, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याकडे त्वरित लक्ष घालत दौंड तहसील कार्यालयातील तहसीलदारपदी अरुण शेलार यांची नियुक्ती केली. (Daund News) शेलार यांनीही तहसीलदारपदाचा कार्यभार स्वीकारला.
दौंड तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी संजय पाटील यांची काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती. मात्र, त्यांच्या जागी नवीन तहसीलदार नियुक्त होत नसल्याने तेच कामकाज पाहत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी तहसीलदारपदाचा कार्यभार सोडल्यानंतर त्यांच्या जागी तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार म्हणून कामकाज पाहणारे अजित दिवटे यांना प्रभारी तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांचीही आता बदली करण्यात आली आहे. त्यामुळे तहसीलदार आणि नायब तहसीलदारही दोन्ही महत्वाची पदे सध्या रिक्त होती.
या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर जबाबदार अधिकारी नसल्याने तहसील कार्यालयाला कोणी वाली नसल्याची स्थिती होती. परिणामी, तहसीलदार कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. तसेच सध्या इयत्ता दहावी व बारावीची परीक्षेचा निकाल लागल्याने विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. पण आता अरूण शेलार यांची नियुक्ती झाल्याने ही चिंता लवकरच मिटेल, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, यापुढे तालुक्यातील नागरिकांना कुठल्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त तहसीलदार अरुण शेलार यांनी दिली.