सागर जगदाळे
Daund News : भिगवण : दौंड तालुक्यातील एका कार्यक्रमासाठी बारामतीहून भिगवण मार्गे जाण्यासाठी निघालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भिगवण नगरीत युवा नेते अजिंक्य माडगे व त्यांच्या मित्र परिवाराने जोरदार स्वागत केले. अजित पवार यांच्या स्वागतासाठी माडगे मित्र परिवाराने बनवलेल्या १००० किलोच्या हाराची परिसरात चर्चा रंगली होती. जेसीबीच्या मदतीने अजित पवार यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली, तर क्रेनद्वारे त्यांना पुष्पहार घालण्यात आला.
स्वागतासाठी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी
स्वामी चिंचोली (दौंड) याठिकाणी विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या उद्घाटन व नामकरण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते. या सोहळ्यासाठी ते भिगवण शहरातून पुढे स्वामी चिंचोली येथे जाणार होते.(Daund News) त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी भिगवणमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पवार यांचा सन्मान क्रेनच्या सहाय्याने १००० किलोचा हार घालून करण्यात आला. या वेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यासाठी युवा नेते अजिंक्य माडगे यांनी जय्यत तयारी केली होती. या वेळी परिसरातील राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : नाथचीवाडी गावचे सर्वसमावेशक नेतृत्व सरपंच सारिका चोरमले
Daund News : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखत धनगर समाजाने दिला ‘हा’ इशारा