गणेश सुळ
Daund News : केडगाव : देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे काम पोस्ट ऑफिसमार्फत करण्यात आले. पुणे शहर टपाल विभाग यांच्या विद्यमाने शुक्रवारी यशदा सभागृह बाणेर, पुणे येथे ‘महिला सन्मान बचत पत्र’ (MSSC) चे खाते उघडण्याच्या मोहिमेत विशेष कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
विशेष कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार
या कार्यक्रमात ‘महिला सन्मान बचतपत्र विशेष मोहीम’ आणि ‘महादेव कोळी’ जमातीवर भारतीय डाक विभाग, पुणे रिजनद्वारे विशेष आवरणचे अनावरण पुणे रिजनचे पोस्ट मास्तर रामचंद्र जायभाये यांच्या हस्ते करण्यात आले. (Daund News) या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन खासदार प्रकाश जावडेकर, आमदार माधुरी मिसाळ, आयकर आयुक्त संग्राम गायकवाड आणि डाक सेवा निदेशिका सिमरन कौर यांची उपस्थिती होती.
देशातील महिलांची आर्थिक समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने 1 एप्रिल 2023 पासून ‘महिला सन्मान बचतपत्र’ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पुणे पोस्टल रिजनने 1 एप्रिल ते 30 जून 2023 या अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये 31,615 ‘महिला सन्मान बचतपत्र’ खाती उघडली आहेत. (Daund News) ज्याची गुंतवणूक सुमारे 237 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पुणे शहर पूर्व विभागाने ‘महिला सन्मान बचतपत्र’ खाते उघडण्यासाठी 23 जून ते 26 जून 2023 पर्यंत तीन दिवसांची विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत तब्बल 10,430 खाती उघडली आहेत, ज्यांची गुंतवणूक रक्कम 39 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
यावेळी बोलताना प्रकाश जावडेकर यांनी भारतीय टपाल विभागाच्या कामगिरीचे कौतुक केले. “महादेव कोळी” जमातीवर विशेष आवरण काढून टपाल विभागाने आदिवासी समाज बांधवांना एका वेगळ्या प्रकारे सन्मानित केल्याचे नमूद केले. टपाल विभागाच्या पुणे पोस्टल रिजनने अल्पावधीत हजारोंच्या संखेने महिलांची “महिला सन्मान बचत पत्र” खाते उघडून एकप्रकारे या सर्व महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे काम केल्याचे नमूद केले. (Daund News) “महिला सन्मान बचत पत्र” म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेली ही विशेष योजना असून, सदर योजना हजारो महिलांपर्यंत पोहचविण्याचे काम भारतीय टपाल विभाग करीत असल्याचे नमूद केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
माधुरी मिसाळ, संग्राम गायकवाड यांनीदेखील पुणे पोस्टल रिजनच्या विशेष कामगिरीचे कौतुक केले. रामचंद्र जायभाये यांनी टपाल विभागाच्या विशेष टपाल आवरणाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्व सांगितले. तसेच टपाल विभागाच्या अनेक विविध योजनांनवर त्यांनी दृष्टीक्षेप टाकला व आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात भारतीय टपाल विभागाचे योगदान अधोरेखित केले. (Daund News) सिमरन कौर यांनी विशेष कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले व जास्तीत जास्त महिलांना “महिला सन्मान बचत पत्र” योजनेत सहभागी करून घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अभिजीत इचके यांनी केले तर आभारप्रदर्शन रिप्पन डूलेट यांनी केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : केडगाव ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार उघड; पैसे हात उसने घेऊन पाईपलाईनची दुरुस्ती