Cyber Crime : पुणे: ऑनलाइन टास्कच्या आमिष दाखवून फसवणुकीच्या प्रकारात वाढ झाली आहे. सातत्याने असे प्रकार घडत असताना देखील उच्च शिक्षित या आमिषाला बळी पडत असून स्वत:ची फसवणुक करुन घेत आहेत. (Cyber Crime) असा एक प्रकार घडला असून सायबर चोरट्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरला तब्बल नऊ लाख ७५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. (The lure of online tasks has put computer engineers in trouble)
चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Cyber Crime) याबाबत एका कॉम्प्युटर इंजिनिअरल तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण संगणक अभियंता आहे. (Cyber Crime) तो नोकरीच्या शोधात होता. तरुणाला चोरट्यांनी एक संदेश पाठविला होता. घरातून ऑनलाइन कामाची संधी आहे. समाजमाध्यमातील जाहिराती, ध्वनिचित्रफितीस दर्शक पसंती (लाइक्स) मिळवून दिल्यास पैसे मिळतील, असे आमिष चोरट्यांनी दाखविले होते. (Cyber Crime) सुरुवातीला चोरट्यांनी तरुणाला परतावा दिला. त्यानंतर ऑनलाइन टास्कमध्ये आणखी काही रक्कम गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी दाखविले होते.
तरुणाने चोरट्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात वेळोवेळी नऊ लाख ७५ हजार रुपये जमा केले. (Cyber Crime) पैसे जमा झाल्यानंतर चोरट्यांनी त्याला परतावा दिला नाही. चोरट्यांचा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले.(Cyber Crime) त्यानंतर तरुणाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलिसांनी संबंधित गुन्हा चंदननगर पोलीस ठाण्याकडे तपासासाठी सोपविला असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Cyber Crime | आभासी चलनात गुंतवणूक करणं पडलं महागात; व्यावसायिकाची तब्बल एक कोटींची फसवणूक…