-बापू मुळीक
सासवड : शिवरी (ता. पुरंदर) येथील पिराचा मळा, हरेश्वर मंदिराच्या जवळ डोंगराळ विभागात रानडुकरामुळे शेतकऱ्यांचे वाटाणा, घेवडा, बाजरी, ऊस या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. शेतशिवारात रानडुकरांनी धुडगूस घातला आहे. त्यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस करुन नुकसान करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे.
‘रानडुकराला मारु नका, नाही तर तुमच्यावरती कारवाई होईल’, असा इशारा वनविभागाने दिला आहे. मग शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, की आमच्या पिकांचे नुकसान होत आहे. आम्हाला सुद्धा जनावरे, मुले आहेत. मग आम्ही उदरनिर्वाह कसा करायचा, पीक हातात येत नाहीना. आमचे नुकसान होत आहे तर आंदोलन करायचे का? नाही तर आम्हाला मारून टाका? असा आक्रोश महिला व शेतकरी बांधवांनी केला. वन विभाग अधिकाऱ्यांनी याबाबत बंदोबस्त केला पाहिजे, तसेच अधिवेशनात सुद्धा पुरंदरच्या आमदारांनी लक्षवेधी विषय मांडून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे, अशी व्यथा शेतकऱ्यांनी व महिलांनी मांडली आहे.
आम्हाला न्याय द्या, नाहीतर आम्हाला मारून टाका. म्हणजे तुमचे भले होईल, वन विभागाला बंदोबस्त करता येत नाही, शेतकऱ्यांकडे लक्ष देता येत नाही. कायमस्वरूपी बंदोबस्त करुन हा विषय अधिवेशनात मांडावा. यावर सामान्य शेतकऱ्यांच्या बाजूने ही व्यथा शेतकरी नवनाथ कामठे व विकास कामठे यांनी मांडली.
यावर वन विभाग अधिकारी यांनी आंदोलन करु नका. घटनेची पाहणी करू, फोटो काढून, पंचनामा करून त्यावर त्वरित काही तरी उपाययोजना करु. तसेच शेतकऱ्यांनी हतबल होऊ नय्.
-सागर ढोले वन विभाग अधिकारी पुरंदर
ससा, हरिण, मोर यांचे सात ते आठ कळप असून शेतक-यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी कमीत कमी पाच ते सहा लाखाचे नुकसान झाले आहे. यावर वन विभाग व आमदारांनी त्वरित लक्ष घालावे, व हा अधिवेशनामध्ये लक्षवेधी प्रश्न मांडून एक प्रकारे शेतकऱ्यांना न्याय द्यावा. ही सामान्य शेतकऱ्याची व्यथा ही वनविभाग व आताच्या सरकारकडून न्याय मिळेल का? या बाबतीमध्ये विकास कामठे व नवनाथ कामठे यांनी माहिती दिली.