लोणी काळभोर : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६७ व्या जयंतीनिमित्त लोणी काळभोर (ता. हवेली) येथे मंगळवारी (ता. १४) विविध धार्मिक व समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती लोणी काळभोर येथील शिवरुद्र प्रतिष्ठाणच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवरुद्र प्रतिष्ठानचे यंदाचे चौथे वर्ष आहे. यावर्षी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जय गणेश साउंड, वीर एकलव्य ढोल पथक, एमआर लाईट शो, तावरे मंडप हे विशेष आकर्षण असणार आहे.
शिवरुद्र प्रतिष्ठानच्या वतीने लोणी काळभोर गावचे ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ मंदिरापासून उद्या मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन शिवरुद्र प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
मुघलांबरोबर झालेली सर्व युद्धे जिंकली
छत्रपती संभाजी राजे हे 10 हजार सैनिकांसह मुघलांच्या एक लाख सैनिकांविरुद्ध लढणारे आणि युद्ध जिंकून परतणारे शूर पराक्रमी होते. संभाजी महाराज कडून होणाऱ्या सततच्या पराभवाला औरंगजेब कंटाळलासुद्धा होता. छत्रपती संभाजी महाराजांनी जवळपास 210 युद्धे लढली आणि ती सर्व जिंकली. अशा शूरवीर लढवय्या राजाचा जन्म पुरंदर येथे 14 मे 1657 साली झाला. त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.