पुणे : राज्यातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत. त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.
दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सतत चढ-उतार होत असतो. पण मागील काही काळापासून किमतीत कोणताही बदल झालेला दिसत नाही. केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार नवीन वर्षात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घसरण होणार होती. मात्र, यामध्ये अद्याप कोणतेही बदल झालेले नाहीत.
आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित घसरण झालेली पाहायला मिळत आहे. WTI क्रूड घसरुण प्रति बॅरल $ 73.67 वर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड देखील $ 78.66 प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. चला तर मग जाणून घेऊया मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरातील आजचे दर.
४ महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर किती?
नवी दिल्लीत : पेट्रोल – 96.72 रुपये प्रति लिटर, डिझेल- 90.08 रुपये प्रति लिटर
मुंबईत : पेट्रोल – 106.31 रुपये, डिझेल-92.76 रुपये प्रति लिटर
कोलकाता : पेट्रोल – 106.03 रुपये, डिझेल – 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नईत : पेट्रोल – 102.73 रुपये, डिझेल – 94.33 रुपये प्रति लिटर
महाराष्ट्रातील इतर शहराचे पेट्रोल-डिझेलचे दर
पुणे : पेट्रोल – 105.96 रुपये, डिझेल – 92.48 रुपये प्रति लिटर
ठाणे : पेट्रोल – रुपये 105.88, डिझेल – 94.38 रुपये प्रति लिटर
नाशिक : पेट्रोल – 106.77 रुपये, डिझेल – 93.27 रुपये प्रति लिटर
नागपूर : पेट्रोल – 106.06 रुपये, डिझेल – 92.61 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर : पेट्रोल-106.47 रुपये, डिझेल – 93.01 रुपये प्रति लिटर
एसएमएसद्वारेही जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे दर
तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.