Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नव्या वर्षात महावितरणची अनोखी भेट; नवीन वीजजोडणी आता तत्काळ उपलब्ध होणार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 8 January 2024, 10:41

पुणे : कृषिपंप वगळता सर्व ग्राहकांना तत्काळ नवीन वीजजोडणी किंवा वीजभार वाढवून देण्यासाठी ‘नवीन सेवा जोडणी’ (एनएससी) योजनेचा पर्याय सर्वप्रथम देण्याच्या सूचना महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना तत्काळ नवीन वीज जोडणी उपलब्ध होणार असल्याची माहिती ‘महावितरण’ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

‘नॉन डीडीएफ ग्राहक योगदान व परतावा’ योजनेत अर्जदार ग्राहक स्वखर्चाने परवानाधारक कंत्राटदाराकडून पायाभूत वीज यंत्रणा उभारण्याचे काम करतात. या खर्चाचा परतावा वीज बिलांमध्ये समायोजित करून दिला जातो. ‘समर्पित वितरण सुविधा’ योजनेत बांधकाम व्यावसायिकांनी किंवा ग्राहकांनी स्वखर्चाने परवानाधारक कंत्राटदारांद्वारे स्वतंत्र वीजवाहिन्या, रोहित्र, उपकेंद्र, क्षमतावाढ आदी पायाभूत यंत्रणा उभारण्याचे काम केल्यास या यंत्रणेची सुविधा संबंधित ग्राहकांसाठी समर्पित राहते. मात्र, या वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महावितरणकडे राहते. नवीन वीज जोडण्यांचे अर्ज तसेच भार वाढवणे अथवा कमी करण्याचे अर्ज ‘नवीन सेवा जोडणी’ किंवा ‘नॉन डीडीएफ ग्राहक योगदान व परतावा’ योजनेमध्ये स्वीकारले जावेत. या योजनांऐवजी ‘समर्पित वितरण सुविधा’ योजनेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांकडून लेखी अर्ज घेऊनच त्यामध्ये कामे करावीत, अशाही सूचना महावितरणने क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या आहेत.

सेवा जोडणी शुल्क, सुरक्षा ठेव भरावी लागणार
वीज ग्राहकांना वीज जोडणी देण्यासाठी ‘नवीन सेवा जोडणी योजना’ महत्त्वाची आहे. यात नवीन वीज जोडणी देणे किंवा वीजभार कमी-अधिक करण्यासाठी ग्राहकाला केवळ सेवा जोडणी शुल्क व सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागते. परंतु, राज्यात काही ठिकाणी या पर्यायाची माहिती ग्राहकांना देण्यात येत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्याची दखल घेत महावितरणने ‘नवीन सेवा जोडणी’ योजनेचा पर्याय ग्राहकांना प्रथम देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध ठेवून ग्राहकांना तत्काळ नवीन वीजजोडणी उपलब्ध करून द्यावी, असेही पत्रकात म्हटले आहे.

 

नवीन वीजजोडण्यांसाठीच्या योजना
– नवीन सेवा जोडणी (एनएससी)
– नॉन डीडीएफ ग्राहक योगदान व परतावा (सीसी ॲण्ड आरएफ)
– समर्पित वितरण सुविधा (डीडीएफ) अशा तीन योजना अस्तित्वात आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45
Next Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयात ‘या’ दिवशी होणार सुनावणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.