Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 3 July 2026, 15:13

पुणे : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच पालकांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक शाळांकडून विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती केली जाते. या मनमानी कारभारामुळे पालकांमध्ये तीव्र असंतोष होता आणि त्यांच्यावर अति आर्थिक भार पडत होता. मात्र, आता अशा खाजगी, सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांवर राज्य सरकार कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

या संदर्भात आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह भाई जगताप, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, बच्चू कडू, अमित गोरखे, शिवाजी गर्जे आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज महत्त्वपूर्ण घोषणा केली.

शाळांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा

 

नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती: प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयात सहायक संचालकांच्या नियंत्रणाखाली विशेष नोडल अधिकारी नेमले जातील. हे अधिकारी शाळांच्या साहित्य खरेदी प्रक्रियेवर थेट देखरेख ठेवतील.

विशेष समितीची स्थापना: ‘सेल्फ फायनान्स ॲक्टच्या कलम 16’ अंतर्गत खाजगी आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या मनमानीवर अंकुश ठेवण्यासाठी एका विशेष समितीचे गठन केले जाईल.

दोषी शाळांवर दंडात्मक कारवाई: लोकप्रतिनिधींनी ज्या विशिष्ट शाळांबाबत तक्रारी केल्या आहेत, त्यांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे आदेश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत. या शाळांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कडक दंडात्मक कारवाई केली जाईल.

जर कोणत्याही शाळेने पालकांना ठराविक दुकानातूनच साहित्य घेण्याचा आग्रह केला, तर नोडल अधिकाऱ्यांमार्फत त्या शाळेची चौकशी होऊन थेट कारवाई केली जाईल. सरकारच्या या निर्णयामुळे शाळांच्या मनमानीला चाप बसणार असून पालकांची आर्थिक लूट थांबण्यास मदत होणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09
Next Post

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.