शिरूर : शिरूर तालुक्यातील कोकडेवाडी न्हावरे येथे अतिक्रमण करून राहत्या घराचे नुकसान केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानदेव कोंडीबा काटे वय ७७, रा. दादाची वस्ती, वाघोली रोड, लोहगाव, पुणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पांडुरंग लक्ष्मण कोकडे (रा. कोकडेवाडी, न्हावरे, ता. शिरूर )याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मे २०२६ रोजी सकाळी १० ते २५ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान कोकडेवाडी गावच्या हद्दीत आरोपीने बेकायदेशीर अतिक्रमण करून फिर्यादी यांच्या राहत्या घराची वरवंड तसेच घरावरील चार सिमेंटची पत्रे पाडून अंदाजे ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी १ जुलै २०२६ रोजी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून.
या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार राजेंद्र बनकर हे करत आहेत.







