पुणे : वारजे वाहतूक विभागाच्या हद्दीत कै. जनार्दन पाटलु चौधरी उद्यान लगतच्या महावितरण मेन डीपी पर्यंत सुमारे ३५ मीटर पर्यंत नो-पार्किंग करण्यात येत असल्याचे तात्पुरते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
या वाहनांना हे आदेश लागू नसतील
अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील. या तात्पुरत्या आदेशाबाबत नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे ४ जून पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shiv Jayanti 2023 : पुण्यात शिवजयंती मिरवणुकीनिमित्त वाहतुकीत बदल ; जाणून घ्या…!
कोरेगाव पार्क भागात मतमोजणीमुळे आजपासून वाहतुकीत बदल…!
पुण्यातील चांदणी चौकातील वाहतुकीत बदल : पर्यायी मार्गाबाबत सविस्तर जाणून घ्या!