राजेंद्रकुमार शेळके
Chakan News : चाकण : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस महाविद्यालयात उत्साहात करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरूवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष एन. डी. पिंगळे, सचिव एस. एस. टिळेकर, प्राचार्य डॉ. आर. व्ही. ढेरे, प्रा. बिरंगळ, प्रा. राम मुदगुले, प्रा. गारगोटे, प्रा. सोनवणे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य डॉ. आर. व्ही. ढेरे यांनी केले. त्यांनी सांगितले की, आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी अनेक लढे, चळवळी, संघर्ष करावा लागलेला आहे. (Chakan News) त्यात अनेकांना बलिदान द्यावे लागले.
समाजात एकमेकांशी सहकार्याची भावना वाढीस लागावी
स्वातंत्र्योत्तर काळात अनेक राज्यांना एकत्रित करून अखंड राष्ट्राची निर्मिती करण्याचे कार्य लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण म्हणून आपण १ नोव्हेंबर हा दिवस “राष्ट्रीय एकात्मता दिवस” म्हणून साजरा करतो. (Chakan News) कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य टिकले पाहिजे. देशात शांतता राहिली पाहिजे, समाजात एकमेकांशी सहकार्याची भावना वाढीस लागावी, राज्यातील विविध प्रश्न सीमावाद चर्चेने सोडविले पाहिजेत, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेस बाधा येणार नाही.
या वेळी प्रा. जैन यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय ऐकत्मतेची शपथ देऊन समाजातील समस्यांची जाणीव करून दिली. (Chakan News) कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. काकडे यांनी केले. आभार प्रा. मुदगुले यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. शिंदे यांनी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Chakan News : चाकण येथे शिवशाही बसला आग ; जीवितहानी नाही, बसचे मोठे नुकसान..
Chakan News : 196 गुंठे जमीन परस्पर विकत व्यावसायीकाची तब्बल अडीच कोटींची फसवणूक