Chakan News : पुणे : व्यावसायीकाची तब्बल अडीच कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील चाकण परिसरातून समोर आला आहे. कुलमुखत्यार पत्राचा गैरवापर करत 196 गुंठे जमीन परस्पर विकत ही फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार 24 सप्टेंबर 2004 ते 15 जुलै 2022 या कालावधीत कुरुळी येथे घडला आहे.
चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
फसवणूक प्रकरणी राजेश शंकरलाल काकाणी (वय 51 रा.वाशी, नवी मुंबई) यांनी चाकण पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.16) तक्रार दाखल केली आहे. (Chakan News) त्यावरून शंभू धोंडिराम पवार ( रा.भोसरी) याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरपीत याला फोर्ट सिटी डेव्हलपर्सतर्फे घेण्याच आलेल्या गट क्रमांक 679 कुरुळी, खेड येथील 73.225 एकर जमिनीबाबत कायदेशीर बाबी पूर्ण करण्याकरीता दिलेल्या कुलमुखत्यार पत्राचा गैर वापर करत फिर्यादी यांच्या परस्पर 110 गुंठे जमीन सात लोकांना विकली, तर 86 गुंठे जमीन ही दोन लोकांना विकली. (Chakan News) अशा प्रकारे परस्पर 2.59 कोटींची 196.9 गुंठे जमीन विकली. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Chakan Crime | मित्रांसोबत खेळायला गेला अन् पुन्हा परतलाच नाही….